घरताज्या घडामोडीआत्मचिंतन करा, शरद पवारांवर काय बोलावं याचं भान येईल, चाकणकर यांचा चंद्रकांत...

आत्मचिंतन करा, शरद पवारांवर काय बोलावं याचं भान येईल, चाकणकर यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

Subscribe

राज्यात सत्ता नसल्यामुळे म्हणून राज्यापालांना हाताशी धरून होईल तशी अडवणूक करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांचं वय झालं असल्यामुळे त्यांच्या लक्षात राहत नसेल असे वक्तव्य केलं. पवार यांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत राज्यपाल यांच वय झालं आणि शरद पवार यांचं वय झालं नाही का? असा सवाल केला. पाटील यांच्या प्रश्नाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तुम्हाला ४ दिवस दिल्लीत थांबूनही भेट दिली नाही. याचं आत्मचिंतन करा तेव्हाच कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि शरद पवार यांच्याबाबत काय बोलावं याचं भान येईल असे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष असून दिल्लीत ४ दिवस थांबला होता तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली नाही. यामुळे आपण जरा आत्मचिंतन करावं, तेव्हा कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि आणि शरद पवार यांच्याबद्दल काय बोलावं याचं भान तुम्हाला येईल अशी खोचक टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्यपालांना हाताशी धरून राजकारण

गेल्या दीड वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडलेली आहे. राज्यातील जनतेला माहिती आहे की, ही नियुक्ती का राखडलेली आहे. राज्य सरकार आपल्या अधिकारामध्ये काही नावे राज्यपालांना देते शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नावे मान्य करतात परंतू राज्यपाल आणि केंद्राचे महाराष्ट्रावर तसेच महाराष्ट्रातील लोकांवर असलेलं प्रेम आपण जवळून पाहतो आहे. राज्यात सत्ता नसल्यामुळे म्हणून राज्यापालांना हाताशी धरून होईल तशी अडवणूक करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

- Advertisement -

जितकं तुमचं वय तेवढी पवारांची कारकिर्द

राज्याचे हित लक्षात घेता शरद पवार यांनी आमदारांची नियुक्ती रखडली यामुळा राज्यपालांना वयाच्या प्रमाणे लक्षात राहत नसेल असे सांगितले आहे. शरद पवार यांनी राज्यपाल यांच्याबाबत बोलले त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या बाजूने वक्तव्य केलं आहे. राज्यपाल भाजपचे पदाधिकारी नाहीत की आपण त्यांच्या बाजूने बोलले पाहिजे. तुमचं जितकं वय आहे. तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरुड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -