घरमहाराष्ट्रपुणेRupali Chakankar : पायाखालची जमीन सरकली की काय? शाईफेक प्रकरणावरुन चाकणकर आक्रमक

Rupali Chakankar : पायाखालची जमीन सरकली की काय? शाईफेक प्रकरणावरुन चाकणकर आक्रमक

Subscribe

राज्यातील राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याने आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेंकावर कधी प्रत्यक्ष तर कधी नाव घेता जहरी टीका करताना दिसत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गट काहीसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आज 11 फेब्रुवारी रोजी बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा, अशा लिहिलेले असलेल्या बॅनरवर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली. याप्रकरणावरुन अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी संताप व्यक्त केला आहे. पायाखालची जमीन सरकली की काय? असा प्रश्न विचारत अप्रत्यक्षरित्या खासदार सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. (Rupali Chakankar Did the ground slide or what Chakankar aggressive over Shaifek case)

राज्यातील राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याने आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेंकावर कधी प्रत्यक्ष तर कधी नाव घेता जहरी टीका करताना दिसत आहे. अशातच बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला होता. त्यांच्या या फ्लेक्सवर शाई फेकण्यात आल्याचे रविवारी समोर आले. या घटनेनं खळबळ उडाली. तसेच तातडीने बॅनर काढण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Supriya Sule On Patel: खरंच, वय हा फक्त आकडा असतो; सुळेंचा पटेलांना टोला

- Advertisement -

जे घडलं ते योग्य नाही- सुळे

शाईफेक प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, हे जे घडलं ते योग्य नाही, हे कोणी केले आहे, याची चौकशी झाली पाहिजे. जे केलंय ते चुकीचं आहे. कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाई फेकणं हे अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

हेही वाचा : CM Shinde : गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद आम्हीच संपवला; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

ट्वीट करत चाकणकरांचा सुळेंवर अप्रत्यक्ष निशाणा

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी शाईफेक प्रकरणानंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर ट्वीट करत त्यांच्या संताप व्यक्त केला आहे. केलेल्या पोस्टमध्ये रुपाली चाकणकर यांनी लिहिले की, पायाखालची जमीन सरकली की काय? असा प्रत्यक्ष सवाल त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंना करत अजून तर आम्हाला मैदानात उतरायचे आहे. मनातून पराभूत झालेल्या वैफल्यग्रस्तांची ढासळलेली विकृत मानसिकता शाईफेकमुळे अजून डागळली.या विकृतीचा मी निषेध करते असे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -