घरताज्या घडामोडीNCP : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा, काय आहे कारण?

NCP : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा, काय आहे कारण?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या महिला आयोगाची जबाबदारी घेतल्यामुळे पक्षातील पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर या महिलांच्या विषयांवर सातत्याने भूमिका मांडत असतात. विरोधकांनी महिलांसंबंधातील विषयांवर आरोप केल्यानंतर किंवा महिलांवर होणाऱ्या अत्यांचारांविरोधात रुपाली चाकणकर या नेहमीच आक्रमक भूमिका मांडत आल्या आहेत. चाकणकर यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांना देण्यात आली होती. पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचे काम रुपाली चाकणकर पाहत होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राजीनामा दिला. यानंतर पक्षातील महिला अध्यक्षपदाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांना देण्यात आली होती. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कोणाला संधी देण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष आणि महिला आयोग अध्यक्ष अशा दोन्ही जबाबदाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यावर आहे. यामुळे त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

पक्षाने जी जबाबदारी दिली ती चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला. या संघटनेच्या कामाची पावती म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले. सामान्य कार्यकर्त्याला आयोगाचे अध्यक्षपद देऊन जो काही सन्मान दिला त्याबद्दल आभारी आहे. राज्य महिला आयोगाचे पद हे संवैधिनिक पद आहे. या पदावर निपक्षपाती काम करणं अपेक्षित असतं म्हणून राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा देते. असे रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई ; खासदार संजय राऊतांचा घणाघात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -