घरताज्या घडामोडीसुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नक्की इंजेक्शनच होती का?, रुपाली चाकणकरांच्या ट्विटने चर्चांना...

सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नक्की इंजेक्शनच होती का?, रुपाली चाकणकरांच्या ट्विटने चर्चांना उधाण

Subscribe

माझ्याकडून जमेल तितकी मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांवर लवकर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनाची मोठी मागणी होत आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वाद सुरु असताना भाजप खासदार सुजव विखेंनी खास विमानाने नगर जिल्ह्यासाठी तब्बल दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणले असल्याचा दावा केला आहे. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांन सुजय विखेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केला आहे. सुजय विखेंनी खास विमानाने आणलेल्या बॉक्समध्ये काय आहे. बॉक्समध्ये नक्की इंजेक्शनेच होती ना? की आणखी काही होते? असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सुजय विखेंच्या व्हिडिओवर आता प्रश्न उठताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी. अशा आशयाचे ट्विट रुपाली चाणकर यांनी केले आहे.

- Advertisement -

सुजय विखेंनी काय म्हटले आहे

सुजय विखेंनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत म्हटले आहे की, सर्व पक्षातील लोकांसाठी ही इंजेक्शन आहेत. त्यामुळे याचे कोणीही राजकारण करु नये, हा व्हिडिओ मुद्दाम दोन दिवस लेट अपलोड काल आहे. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती असे सुजय विखे पाटील यांन म्हटले आहे. तर माझ्याकडून जमेल तितकी मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न करत आहे. तरुण युवक तडफडत आहेत त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण आणू नये, ज्या लोकांनी मला खासदार केले आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडून जमेल तेवढी मदत मी करत आहेत. लोकांना डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही. हा पैसा कमवण्याचा धंदा नाही आहे तर लोकप्रतिनिधी म्हणून हे काम करणे माझी जबाबदारी आहे. याचे मला समाधान असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्यात रेमडेसिवीरची कमतरता असल्यामुळे सुजय विखे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक सवाल उठत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन सुजय विखेंच्या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नक्की काय होते याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -