घर महाराष्ट्र कंबोज यांना बायकोमध्ये राखी सावंत दिसली पाहिजे; रुपाली ठोंबरे संतप्त

कंबोज यांना बायकोमध्ये राखी सावंत दिसली पाहिजे; रुपाली ठोंबरे संतप्त

Subscribe

मुंबईः भाजप नेते मोहित कंबोज यांना बायकोमध्ये राखी सावंत दिसली पाहिजे, असा संताप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंतशी केली होती. त्यावर रुपाली ढोंबरे यांनी संताप व्यक्त करत कंबोज यांना सज्जड दमच दिला आहे.

पुन्हा असं कोणी काही बोललं तर त्याची खैर नाही. कंबोज यांना शांत बसता येत नसल्यास त्यांनी तोंड गप्प ठेवावे. कंबोज शांत बसले नाही तर त्यांना महिलांचा काय राग आहे तो मुंबईत येऊन दाखवावा लागेल, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले. मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं … एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में ….. दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा… सनसनी कौन मचाई गा !” त्यांच्या अशा आशयाच्या ट्वीटमुळे आता आणखी एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. ज्याप्रमाणे नेहमी राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणावरून रोज सनसनी निर्माण करत असते, त्याचप्रमाणे सुषमा अंधारे या देखील तिची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोघींमध्ये दररोज खळबळजनक वक्तव्य कोण करेल यासाठी स्पर्धा सुरू असते, असे मोहित कंबोज यांच्याकडून त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे.

ठाकरे गट आणि भाजपमध्ये फडतूस आणि काडतूस या शब्दावरून कलगीतुरा रंगला आहे. या मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. ज्यामुळे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त ट्वीट केले असल्याचे बोलले जात आहे. या ट्वीटवर संताप व्यक्त करत रुपाली ठोंबरे यांनी कंबोज यांना खडेबोल सुनावले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -