घरमहाराष्ट्रअमेरिकेत वारली पेंटींगला मिळाला ७ हजार २१० रूपयांचा दर

अमेरिकेत वारली पेंटींगला मिळाला ७ हजार २१० रूपयांचा दर

Subscribe

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या ठिकाणी भारतीय संस्कृती आणी पारंपारीकतेला किती महत्त्व आहे, हे पाहायला मिळाले. यावेळी वारली पेटिंग्जला अमेरिकेत चांगला दर मिळाला आहे.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या ठिकाणी भारतीय संस्कृती आणी पारंपारीकतेला किती महत्त्व आहे, हे पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांनी सॅनफ्रॅन्सिस्को येथे बचतगटांच्या महिलांसमवेत फेसबुक मुख्यालय, व्हॉट्सअॅप प्रतिनिधी तसेच टीआयई संस्थेला त्यांनी भेट दिली असून ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या दौऱ्यावर राज्यातील सर्वात जुनी पण प्रचलीत अशा वारली पेंटींगला ७ हजार २१० रूपयांचा दर मिळाल्याने राज्याची मान उंचावले आहे.

एका वारली पेंटिंगची १०३ डॉलर्सना विक्री

यावेळी महाराष्ट्रातील बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंविषयी तेथील प्रतिनिधींनी मोठे कुतुहल व्यक्त करतानाच त्यातील काही वस्तुंची खरेदीही केली. तांब्याच्या एका बॉटलची ३० डॉलर्सना तर एका वारली पेंटिंगची १०३ डॉलर्सना विक्री झाली. भारतीय रूपयात तांब्याच्या एका बॉटलला २ हजार १०० रूपये तर वारली पेंटींगला ७ हजार २१० रूपये मिळाले. १५ मिनिटात ३५ हजार ७०० रूपयांच्या सॅम्पल (नमुना) वस्तूंची विक्री झाल्याने बचतगटांच्या महिला प्रतिनिधीही यावेळी भारावून गेल्या.

- Advertisement -

वाचा : ग्रामीण बचतगटांच्या महिला निघाल्या अमेरीकेला

विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या 

फेसबुक आणि व्हॉटसअॅप दोन्हीही समाजमाध्यमांना, त्यांच्याकडील तंत्रज्ञान भारतातील आणि राज्यातील महिलांना देऊन त्यांना त्यांच्यातील कौशल्यांना जगासमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर काम करण्याचे आवाहन मंत्री मुंडे यांनी यावेळी केले. येथील अद्ययावत माहिती घेवून ग्रामीण भागातील बचतगट हायटेक झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. राज्यातील युवकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फेसबुक आणि व्हॉटसअॅप एकत्र काम करणार आहेत. दोन्ही समाजमाध्यमांचे प्रतिनिधी डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार असून दोघांनीही ही भागीदारी पुढे नेण्यासाठी बैठकीत सहमती दर्शविली. यावेळी फेसबुकच्या प्रतिनिधी मीरा पटेल, आरती सोमण, ब्रेंडा आणि कोलिन, व्हाट्सॲप प्रतिनिधी बेन्सापल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

- Advertisement -

रोजगार निर्मितीसाठी ‘टीआयई’ शी भागीदारी

राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता तीन वर्षासाठी संयुक्त भागीदारी करण्याबाबत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी सिलीकॉन व्हॅलीतील टीआयई (द इंडस् आन्त्रप्रेनुअरशिप) संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. टीईआयच्या मदतीने महाराष्ट्रातील महिला तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता संयुक्त भागीदारी करण्याबाबत मंत्री मुंडे यांनी त्यांच्या प्रतिनिधी समवेत चर्चा केली. राज्यात उमेद आणि माविमच्या माध्यमातून तसेच दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या रोजगार निर्मितीच्या कामाची त्यांनी माहिती दिली. बचतगट प्रतिनिधी राजश्री राडे, विमल जाधव, संगीता गायकवाड यांनी त्यांचा गाव ते अमेरिका हा जीवनप्रवास सांगितला. त्यांच्या कार्याचे सर्वांनी कौतूक केले. टीआयईचे संस्थापक अध्यक्ष सुहास पाटील यांनी संस्थेच्या कामाचे सादरीकरण केले. यावेळी टीआयईचे कार्यकारी संचालक विजय मेनन, जय विश्वनाथन, विश मिश्रा, राजू रेड्डी, करपगन नारायणन, अनु जगदीश, मतिन सय्यद, करूणाकरण, अजय पटवर्धन आणि फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद उपस्थित होते. तसेच टीआयईच्या प्रतिनिधींना नोव्हेंबर महिन्यात राज्यात येण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -