घरमहाराष्ट्रपवार जागेच आहेत! दुखणारे पोट शेकत बसा; सामनातून भाजपवर टीका

पवार जागेच आहेत! दुखणारे पोट शेकत बसा; सामनातून भाजपवर टीका

Subscribe

'निसर्ग' वादळात 'बाम'च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला गेले. यावर चंद्रकांत पाटलांनी, शरद पवारांना आता जाग आली का? असा सवाल केला होता. यावर आता सामनातुन चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं आहे. “शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा,” असा टोला लगावला आहे. शिवाय, “पश्चिम बंगालमध्ये वादळ आणि महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही?” असा सवालही सामनातुन केला आहे.

“पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसत आहे. महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होणार नाही. त्यानंतरही भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे,” असा सल्ला देखील सामनातुन दिला आहे.

- Advertisement -

शरद पवार नेहमीच जागे असतात

“कोणी चांगले, महाराष्ट्राच्या हिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. शरद पवारांना आता जाग आली का, हा त्यांचा सवाल आहे. शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असं देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत, असा खरमरीत टोला चंद्रकांत पाटलांना आणि भाजपला लगावला आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात कोरोना लस बनवण्यावर चर्चा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -