Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भीती कोरोनाची नसून लॉकडाऊनच्या सैतानाची

भीती कोरोनाची नसून लॉकडाऊनच्या सैतानाची

देशात पुन्हा एकदा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भीती कोरोनाची नाहीतर लॉकडाऊन या सैतानाची आहे.

Related Story

- Advertisement -

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी व्यक्त केली. मात्र, आता कोरोनाची नाहीतर लॉकडाऊन या सैतानाची भीती सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. टमहाभारताचे युद्ध १८ दिवसांचे. कोरोनाचे युद्ध २१ दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरुच आहे’, असा टोला सामनाच्या रोखठोक मधून लगावण्यात आला आहे.

देशात आणीबाणीची परिस्थिती

देशात पुन्हा एकदा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भीती कोरोनाची नाहीतर लॉकडाऊन या सैतानाची आहे. कारण आता काही झाल तरी लॉकडाऊन नको, अशी लोकांची मानसिकता स्पष्ट दिसत आहे. कारण या सगळ्याचा संबंध शेवट नोकरी, रोजगार आणि आर्थिक उलाढालीशी येत आहे. लॉकडाऊनचा मार्ग पुन्हा स्वीकारला तर नुकताच उभा राहिलेला उद्योग पुन्हा एकदा कोसळून पडेल. असे पाहिला गेले तर कोरोनाला कोणालाच सोडत नाही. तो कोणामध्येच भेदभाव करत नाही. कारण तो जात, धर्माची अस्पृश्यता पाळत नाही. असं पाहायला गेले तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना एकदा सोडून दोनदा कोरोनाची लागण झाली. तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, राज्यात दररोज २५ हजार तर मुंबईत दररोज पाच रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत, असे पाहिला गेले तर लोकांना ‘टाळेबंदी’ नको हे मान्य, पण ‘कोरोना’वा कसे थोपवायचे? स्वस्त:वर निर्बंध घालून शिस्त पाळायला कोणीच तयार नाही.

विरोधी पक्ष आता यावर उपाययोजना देणार?

- Advertisement -

राज्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतल्या मोठ्या शहरात सध्या कोविड सेंटर्स आज पूर्ण भरले आहेत. नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालय देखील पूर्ण भरली आहेत, असे संकट राज्यावर आले आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हात धुवा, मास्क लावा, अंतर पाळा, अशा सूचना देत होते. त्यावेळी विरोधकांनी मात्र टीका केली. त्यामुळे टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार? विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी आणि राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहेत, याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही.


हेही वाचा – ‘अनिता’ नावाची एक डेरेदार सावली!


- Advertisement -

 

- Advertisement -