घरमहाराष्ट्रसामनाच्या अग्रलेखातून पवार कुटुंबात आग लावण्याचे काम - नितेश राणे

सामनाच्या अग्रलेखातून पवार कुटुंबात आग लावण्याचे काम – नितेश राणे

Subscribe

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटी घडवून देण्याचे काम संजय राऊत चोख पद्धतीने करत आहेत. पण संजय राऊत हे पवार कुटुंबियात आग लावण्याचे काम करत आहेत, असा घणाघात नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे.

नितेश राणे (Nitesh rane) यांनी सध्या ठाकरे गट आणि ठाकरे कुटुंबावर आसूड ओढण्याचे काम सुरू केले आहे. संजय राऊत (Sanjay raut) यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर नितेश राणे हे त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार असले तरी ते शरद पवार यांच्या जवळ आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटी घडवून देण्याचे काम संजय राऊत चोख पद्धतीने करत आहेत. पण संजय राऊत हे पवार कुटुंबियात आग लावण्याचे काम करत आहेत, असा घणाघात नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका, म्हणाले…

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, आग लावणे, चोमडेगिरी करणे, नाना पटोलेंच्या भाषेत चोमडेगिरीमध्ये पी. एचडी केलेली आहे. आजच्या सामन्यातून पवार कुटुंबियांच्यामध्ये आग लावण्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यामुळे आजचा सामनामधील अग्रलेख महाराष्ट्राच्या जनतेने नीट वाचावा. पवारसाहेबांना कळकळीची विनंती करतो की, राऊतांना घरी घेऊ नका. हे घरी घेण्याच्या लायकीचे नाही. परत परत आग लावण्याचे काम राऊत करत आहेत. एक डोळा पवार कुटुंबावर तर दुसरा डोळा तेजस आणि आदित्य ठाकरेंवर आहे,” असे म्हणत राणेंनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

राऊतांचे संपूर्ण राजकारण सौदेबाजीवर…
संजय राऊत यांचे संपूर्ण राजकारण हे सौदेबाजीवर चालते, असा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. संजय राऊत हे बेळगावात प्रचाराला येऊ नये, यासाठीची किंमत बेळगावातील भाजप उमेदवाराला मोजावी लागेल, असा फोन भाजप उमेदवाराला आल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. पण मी राऊतांच्या प्रचाराला घाबरत नाही, जनता मला निवडून देईल, असे सांगत भाजप उमेदवाराने तो फोन बंद केल्याचे देखील नितेश राणे यांत्याकडून सांगण्यात आले. जर भाजपच्या उमेदवाराने ऑफर स्विकारली असती तर राऊत बेळगावला गेले नसते, अशी माहिती राणेंनी दिली.

- Advertisement -

जसा मालक, तसा कामगार…
ज्याप्रमाणे संजय राऊत हे सौदेबाजीचे राजकारण करत आहेत, तसेच उद्धव ठाकरेंनी देखील केलेले आहे, असे नितेश राणे यांच्याकडून सांगण्यात आले. याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आयुष्यात काही वेगळे केलेले नाही, हेचं केलं आहे. नारायण राणेंनी शिवसेना का सोडली? कारण शन्मुखानंदमध्ये झालेल्या सभेत राणे साहेबांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची लोकं तिकीट विकत आहेत, हे सत्य मांडले. ज्यानंतर राणे साहेबांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी षङयंत्र केलं. यांचे पूर्ण राजकारण हे पैशांवर चालणारे आहे, असा घणाघात नितेश राणेंनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -