घरमहाराष्ट्रअजित पवार म्हणजे 'गटारातील किडा' - सामना

अजित पवार म्हणजे ‘गटारातील किडा’ – सामना

Subscribe

अजित पवार म्हणजे 'गटारातील किडा', 'मुतऱ्या तोंडाचा' अशा शब्दात सामनातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.

अजित पवार म्हणजे ‘गटारातील किडा’, ‘मुतऱ्या तोंडाचा’ अशा शब्दात सामनातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. ज्यांना आपल्या बापाचं स्मारक बांधता येत नाही ते अयोध्येत जाऊन काय करणार आहेत? अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्ये केलं होतं. त्यावरून ‘सामना’तून आज अजित पवार यांच्यावर टीकेचे वाग्बाण चालवण्यात आले आहेत. अजित पवारांची खोपडी रिकामी आहे. त्यांना आम्ही किंमत देत नाही. अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला अशा शब्दात अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

काय म्हटलं आहे सामनामध्ये?

- Advertisement -

अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. हे गटारही त्याचे स्वत:चे नसून त्याच्या पक्षानेच निर्माण केले आहे. त्यामुळे या गटारी किड्यास महाराष्ट्रातील जनता कोणतीही किंमत देत नाही. सोलापूरच्या धरणग्रस्तांची देखील धरणात पाणी नाही तर मुतायचं का? अशी निर्लज्ज भाषा वापरून महाराष्ट्राच्या संस्कृतीस काळिमा फासला होता व समस्त दुष्काळग्रस्तांना अपमानित केले होते. या महाशयांनी एकदा आमच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली होती. त्यावर आम्ही त्यांचे दात त्यांच्या घशात घातले होते. पण, का रे बारामतीच्या गटारीच्या किड्या तू तुझ्या छंदाचे प्रदर्शन उघडरपणे करू शकशील का? असा सवाल देखील अजित पवार यांना विचारण्यात आला आहे. काकांच्या पुण्याईनं व कृपेने ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या मुतऱ्या थोबाडाने बोलत असतात. शिवाय सिंचन घोटाळ्यावरून देखील अजित पवारांवर सामनातून कडाडून टिका करण्यात आली आहे. अजित पवारांची खोपडी रिकामी असून आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राममंदिरास विरोध हे त्यांचे धोरण आहे. अजित पवारांनी श्रीरामाचाही अपमान केल्याचं सामनातून म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -