घरताज्या घडामोडीमराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, सारथी संस्था बंद करणार नाही!

मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, सारथी संस्था बंद करणार नाही!

Subscribe

मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी २०१८ साली ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे’ या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेच्या अधिकार्‍यांनी काही गैरव्यवहार केले आहेत. त्याची पुढील १० दिवसांत चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे. मात्र, मराठी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असलेली ही संस्था बंद केली जाणार नाही, तसेच संस्थेची स्वायत्तता देखील कायम ठेवली जाणार आहे. तसेच पुढील १५ दिवसांत फेलोशिप घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या खात्यात फेलोशिपचे पैसे वळते केले जाणार असल्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. ‘सारथी संस्था स्वायत्त आहे, असे सांगून संस्थेचे अध्यक्ष मनमानी कारभार करत होते. सरकारने फक्त निधी द्यावा, बाकी आम्हाला जाब विचारू नये, अशी त्यांची भूमिका होती. जी सरकारला स्वीकारार्ह नव्हती’, असे वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

‘कुणाचेही पैसे थकणार नाहीत’

‘जे विद्यार्थी दिल्ली येथे युपीएससी परिक्षेचे प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्या फेलोशिपचे पैसे आम्ही देणार आहोत. युपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी ७० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. मग, आम्ही त्यात १० टक्के सूट दिली आहे. त्यानंतरही सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या, अशी मागणी होत आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, कुणाचेही पैसे थकवणार नाही’, अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -