Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सचिन वाझेला मुख्यमंत्र्यांचा पाठींबा होता; नारायण राणेंचा आरोप

सचिन वाझेला मुख्यमंत्र्यांचा पाठींबा होता; नारायण राणेंचा आरोप

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेवरुन नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेला मुख्यमंत्र्यांचा पाठींबा होता, असा आरोप नारायण राणे यांनी केला. सचिन वाझे सत्ताधाऱ्यांना पैसे पुरवण्याचं काम करत होता, असा आरोप देखील राणेंनी सरकारवर केला आहे. साध्या एपीआयकडे एवढ्या गाड्या असतात का? असा सवाल देखील राणेंनी केला.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली. “राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सकाळी कामावर निघालेला व्यक्ती रात्री घरी जाईल का याची मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शास्वती नाही.राज्यात खंडणीखोरीची कामं सुरु आहेत. १०० कोटी जमा करुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे द्यायचे, ही जबाबदारी पोलिसांकडे होती,” अशी टीका राणेंनी केली आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझेवरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “सचिन वाझे जे काही करत होता, त्यामागे कोणीतरी गॉडफादर होता. हे कृत्य कोणत्याही गॉडफादरशिवाय करु शकत नाही. सचिन वाझेचे इतके फ्लॅट आले कुठून? वाझेला बोलवून १०० कोटींची मागणी होती मग वाझे ८ काय १०० गाड्या घेईल. वाझेला मुख्यमंत्र्यांचा पाठींबा होता,” असा आरोप नारायण राणे यांनी केला.

- Advertisement -

- Advertisement -