Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मी त्यांच्याकडे आलो, कलाटेंच्या भेटीनंतर अहिरांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मी त्यांच्याकडे आलो, कलाटेंच्या भेटीनंतर अहिरांची प्रतिक्रिया

Subscribe

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीने आता जोर धरला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर हे त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले आहेत. सुमारे एक तास चर्चा देखील झाली. उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मी त्यांच्याकडे आलो, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी कलाटेंच्या भेटीनंतर दिली.

सचिन अहिर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही आधी जागा मागत होतो, पण ती जागा राष्ट्रवादीला गेली. कलाटे हे शिवसेनेसोबत काम करत आहेत. आता ते उमेदवारही आहेत. म्हणून पक्षाचा आणि उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी त्यांच्याकडे आलो आहे. त्यांच्याशी चर्चाही केली, असं सचिन अहिर म्हणाले.

- Advertisement -

राजकीय भवितव्याचा विचार करून योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा. पक्षप्रमुखांसोबतही त्यांचं बोलणं झालं आहे. ते त्यांच्या प्रमुख सहकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करून उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात निर्णय देतील, असं सचिन अहिर म्हणाले.

महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने माघार घ्यावी, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली आहे. तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही कलाटे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता कलाटे माघार घेणार की नाही, याबद्दल संभ्रम अद्यापही कायम आहे.

- Advertisement -

सकाळी ११ वाजताच्या सुमारास सचिन अहिर, शिवसेनेच्या महिला संघटिका सुलभा उबाळे, शहर प्रमुख सचिन भोसले यांनी वाकड येथे येऊन कलाटे यांच्याशी चर्चा केली. यावेळी अहिर यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे कलाटे यांनी आघाडी धर्म म्हणून माघार घ्यावी, अशीही विनंती केली आहे.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर राहुल कलाटेंच्या


 

- Advertisment -