…तर एक दिवस उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील, सचिन अहिरांनी व्यक्त केला विश्वास

sachin ahir

जनता आगामी निवडणुकीतून उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार, खासदार परततील. पण शिवसेनेचे दरवाजे बदं असतील, असा टोला शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्त्व यशस्वीपणे करत होते. त्यामुळे एक दिवस उद्धव ठाकरे देशाचंही नेतृत्त्व करतील, या भीतीनेच भाजपने शिवसेनेत फूट पाडली, असाही आरोप अहिर यांनी केलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अहिर बोलत होते. (Sachin Ahir talked about Uddhav thackeray will become leader of India)

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन; जे पोटात मळमळत होते, ते ओठावर आले, संजय राऊतांचा टोला

या मेळाव्यात बंडखोर आमदारांवर त्यांनी तोफ डागली. कोण कोणाला चिठ्ठ्या देतंय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे. याला उत्तर जनता देईल. त्यांना हे आवडलं नाही, असं सचिन अहिर म्हणाले. तसेच, त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांनाही टोला लगावला. निदान त्यांनी तरी शिवसेना सोडायला नको होती, असं अहिर म्हणाले. ‘खासदार बारणे यांना उद्धव ठाकरे यांनी मानसन्मान दिला. खासदारकी दिली. त्यांच्या खासदारकीबाबत आम्ही राष्ट्रवादीला स्पष्ट विरोध केला होता. ती सीट आमची आहे, असं म्हटलं होतं,. रेकॉर्ड काढून बघा, मोदी लाटेत कोणालाही उमेदवारी दिली असती पण ती बारणे यांनाच दिली. उद्धव ठाकरे यांना सर्व सोडून जातायत अशा वेळी त्यांनी सोबत राहायला हवं होतं. दुर्दैव हेच आहे की त्यांनी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केलाय, आमदार, खासदार पक्षात आले नाहीत तरी सच्चा शिवसैनिक, कार्यकर्ता पक्षात पुन्हा परतत आहेत.”

हेही वाचा – निष्ठावान शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये हे सरकार वाहून जाईल, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा