घरताज्या घडामोडीराज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार, सचिन सावंतांचा आरोप

राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार, सचिन सावंतांचा आरोप

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. परंतु काही कारणास्तव राज ठाकरेंचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत तूर्तास दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. तसेच २२ मे रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील गणेश कला क्रिडा केंद्रात यावर सविस्तर बोलूच असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले. पण हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक मनसेची कुचंबणा केली, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. उत्तर भारतीयांचा अपमान केल्याबद्दल राज ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. राज ठाकरेंनी आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केल्याचा आरोप बृजभूषण सिंह यांनी केला आहे. त्यांच्या दौऱ्याआधीच उत्तर प्रदेशात पोस्टरबाजी देखील करण्यात आली होती. मुंबईतील लालबाग परिसरात मनसेकडून पोस्टरबाजी करत इशारा देण्यात आला होता.

- Advertisement -

एकीकडे राज ठाकरेंना विरोध होत असताना दुसरीकडे कांचनगिरी यांनी त्यांची बाजू घेतली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना रोखूनच दाखवावं, असं म्हणत राज ठाकरेंची बाजू घेतली होती.

अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया..

राज ठाकरेंनी ५ जूनचा दौरा रद्द केला आहे. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की केलं असतं. कारण शेवटी अयोध्या आहे, तिथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे.अयोध्येत शिवसेनेचं नेहमीचं स्वागत करण्यात आलं आहे. अयोध्येच्या जनतेनी साधू संतांनी आणि अयोध्येच्या राजकारणांनी उत्तर प्रदेशमध्ये नक्कीच स्वागत केलं आहे. परंतु मला असं समजलं आहे की, ते आता अयोध्येला जात नाहीयेत, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : …तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती, अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया..


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -