घरताज्या घडामोडीसोमय्यांची नौटंकी मनोरंजक, फुकटचे मनोरंजन कोण बंद करेल, सचिन सावंत यांचा खोचक...

सोमय्यांची नौटंकी मनोरंजक, फुकटचे मनोरंजन कोण बंद करेल, सचिन सावंत यांचा खोचक टोला

Subscribe

सोमय्या कोणाच्याही मालमत्ता बेनामी म्हणून दाखवतात म्हणून जनतेत घबराट आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्लीतील नेते मुजरा करायला देत नाहीत त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत असतात अशी खोचक टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सोमय्यांचे फुटकटचे मनोरंजन कोण बंद करेल असा टोलाही सावंत यांनी सोमय्यांना लगावला आहे. किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील घराखाली पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावून कोल्हापूरात न येण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरात जाणार होते. मुश्रीफ यांचे समर्थक संतापले असल्यामुळे सोमय्यांना कोल्हापूरात न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे सरकार घाबरलं असल्यामुळे कारवाई करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यावर सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा असा सल्ला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिला आहे.

- Advertisement -

सोमय्यांच्या आरोपामुळे जनतेत घबराट

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पुढे म्हटलं आहे की, “फडणवीस सरकारच्या काळात केवळ कडकनाथ कोंबड्या दाखवल्या म्हणून तडीपार करणारे, सभेत काळे कपडे घालण्यास मनाई करणारे व आंदोलना आधीच स्थानबद्ध करणारे भाजपा नेते सोमय्यांना नोटीस दिली म्हणून गळे काढत आहेत. बाबांनो, सोमय्या कोणाच्याही मालमत्ता बेनामी म्हणून दाखवतात म्हणून जनतेत घबराट आहे. दुसऱ्याच्या मालमत्ता तिसऱ्याची म्हणून सांगितल्यावर लोक बोंब मारणार की नाही? सोमय्यांच्या नौटकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून जिल्हा बंदी आहे. सोमय्या तक्रारी करत आहेत ना!. नाहीतरी राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या आहेत मग त्यांचे काम भाजपाच करणार का?” असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, सोमय्यांचा गंभीर आरोप


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -