आपल्या खासदारावर शंका असेल तर बृजभूषण यांना निलंबित करा, काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

sachin sawant slams praveen darekar suspend Brij Bhushan singh If there is any doubt
आपल्या खासदारावर शंका असेल तर बृजभूषण यांना निलंबित करा, काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray ) अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्या दौरा करु देणार नाही असा इशारा बृजभूषण सिंह (Brij Bhushan singh) यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी आपला दौरा रद्द केला असून दौऱ्याविरोधात रसद पुरवल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. महाराष्ट्रातून दौऱ्याच्या विरोधात रसद पुरवली जात होती असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. यानंतर आता भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र राज ठाककरेंच्या अयोध्या द ट्रॅप चा रचयिता भाजप असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. भाजपकडून आपल्याच खासदाराच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. असे असेल तर त्याना पक्षातून निलंबित करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin Sawant) यांनी केली आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महाराष्ट्रातील भाजपच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात ट्रॅप रचत होता असा आरोप केला आहे. “अयोध्या द ट्रॅप” या चित्रपटाचे कथानक भाजपानेच रचले व महाराष्ट्रातील भाजपनेच रसद पुरवली या मताशी आम्ही ठाम आहोत असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर त्यांनी घणाघात केला आहे. महाराष्ट्रातील भाजप आपली कातडी वाचवण्यासाठी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ‌प्रविण दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशी कनेक्शनमुळे ते विरोध करत नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली. जर असे असेल तर बृजभूषण यांना पक्षातून निलंबित करावे. पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे? आपल्या खासदारावरच शंका घेणे ही गंभीर बाब आहे. भाजपाचा उत्तर भारतीयांसाठी कळवळा ही खोटा दिसतो असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

बृजभूषण यांच्याकडून पवारांचे कौतुक – दरेकर

जनतेला सर्व काही कळतं आणि राज ठाकरेंचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर होता. कारण बृजभूषण सिंह यांचे वक्तव्य पाहिले तर सुप्रिया सुळे आम्हाला लाडू द्यायच्या, शरद पवारांचे कौतुक अशा प्रकारे हे संबंध जोडलेले नाहीत ना? अशी शंका त्यांच्या भाषणात आली आहे.


हेही वाचा : औरंगजेब कबर ते आदित्य ठाकरेंपर्यंत राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे