घरमहाराष्ट्रSachin Tendulkar : चला पृथ्वीला वाचवूया; मास्टर ब्लास्टरने ट्वीट केला 'तो' व्हिडीओ

Sachin Tendulkar : चला पृथ्वीला वाचवूया; मास्टर ब्लास्टरने ट्वीट केला ‘तो’ व्हिडीओ

Subscribe

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील काही दिवसांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. परंतु आलेले पर्यटक हे त्यांच्याकडील टाकाऊ वस्तू तेथेच कुठेतरी टाकून मोकळे होतात. असे असतानाच या प्रकल्पात प्लास्टिकच्या पाण्याचा बाटल्या आढळण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून व्हायरल होत असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘त्या’ वाघाचा व्हिडीओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत चला आपली पृथ्वी वाचवूया असे कॅप्शन लिहिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Sachin Tendulkar Lets save the earth Master Blaster tweeted that video)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही दिवसांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. परंतु आलेले पर्यटक हे त्यांच्याकडील टाकाऊ वस्तू तेथेच कुठेतरी टाकून मोकळे होतात. असे असतानाच या प्रकल्पात प्लास्टिकच्या पाण्याचा बाटल्या आढळण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकल्पातील एका वाघाने त्याच्या नैसर्गिक पाणवठ्यातून प्लास्टिकची बाटली बाहेर काढली. एक वन्यजीवप्रेमीने काढलेला हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांनी या व्हिडीओवर मतही नोंदवली आहेत. हाच व्हिडीओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यापर्यंत पोहोचताच त्याने तो व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर ट्वीट करत निसर्गप्रेमींसह नागरिकांना पृथ्वी वाचविण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

काय लिहिले सचिनने ट्वीटमध्ये?

क्रिकेट जगतातील देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकर सध्या खेळत नसला तरी तो समाज माध्यमांवर या ना त्या कारणाने सक्रीय असतो. व्हायरल होत असलेला व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट करत लिहिले की, वाघीण स्वतःच्या तोंडाने तलावातील प्लॅस्टिक उचलताना दिसते. यातून आपणही शिकायला हवे की, निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आपलीही आहे. आपल्या पृथ्वीचे रक्षण आपणच केले पाहिजे असे आवाहन त्यांनी निसर्गप्रेमींसह सर्वसामान्यांना केलं आहे.

- Advertisement -

जाणून घ्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाविषयी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे 116.55 कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे 508.85 किमी क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे 625 चौ कि.मी. आहे.
हा व्याघ्र प्रकल्प विदर्भातील चंद्रपूर जिल्हयातील आहे. याची स्थापना 1955 साली जेव्हा तो मध्य प्रांताचा भाग होता, तेव्हा झाली. ते महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -