सचिन तेंडुलकर- राज ठाकरेंमध्ये शिवतिर्थावर सदिच्छा भेट, व्हिडिओ व्हायरल

sachin tendulkar meets raj thackeray at his bungalow shivtirth
सचिन तेंडुलकर- राज ठाकरेंमध्ये शिवतिर्थावर सदिच्छा भेट, व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतिर्थावर पोहचला होता. सचिन आणि राज एकत्र गॅलरीत उभे असतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावेळी सचिनसह राज ठाकरेंनी खाली जमलेल्या लोकांना हस्तांदोलनही केले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतं आहे. सचिन तेंडुलकरने राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांच्या भेटीगाठी कृष्णकुंजवर होत होत्या परंतु आता नव्या निवासस्थानी या भेटीगाठी होतात. राज ठाकरे आता शिवतिर्थ या नव्या घरात वास्तव्यास आहेत. हे घर कृष्णकुंजच्या शेजारीच आहे. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी शिवतिर्थावर प्रवेश केला आहे. सचिन तेंडुलकर हा शिवतिर्थावर राज ठाकरेंची भेठ घेण्यासाठी गेलेला दुसरा ठरला आहे. यापुर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची शिवतिर्थावर जाऊन भेट घेतली होती.

सचिन तेंडुलकरने राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीची कोणालाही कल्पना नव्हती परंतु राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर गॅलरीमध्ये आल्यावर लोकांनी त्यांना पाहिले. यावेळी सर्वांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. राज आणि सचिन यांनी देखील खाली जमलेल्या लोकांच्या दिशेने हात दाखवत त्यांना प्रतिसाद दिला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत शिवतीर्थावर, मुलीच्या लग्नाचे दिलं निमंत्रण