मुंबई-गोवा प्रवासादरम्यान सचिन तेंडुलकरने घेतला टपरीवरच्या चहाचा आस्वाद; व्हिडीओ व्हायरल

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सचिन कधी त्याचे फोटो तर कधी त्याचे व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना त्याचे नवनवीन अपडेट देत असतो. दरम्यान, सचिनने नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका प्रवासा दरम्यान एका ठिकाणी थांबलेला दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे चाहते देखील हा व्हिडीओ पाहून सचिनच्या साधेपणावर खूश झाले आहेत.

सचिनने शेअर केला व्हिडीओ
सचिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेला थांबला असून एका टपरीवर चहा-टोस्टचा आनंद घेत आहे. या व्हिडीओमध्ये सचिनचा मुलगा अर्जुन देखील दिसत आहे. सचिन त्याला चहा घेणार का असं विचारतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते सचिनचा हा व्हिडीओ पाहून खूप खूश झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

सचिनने शेअर केलेल्या या व्हिडीओखालील हॅशटॅग वरुन लक्षात येतंय की तो मुंबई-गोवा असा प्रवास करत आहे. या व्हिडीओमध्ये चहा-टोस्टचा आस्वाद घेतल्यानंतर सचिन चहावाल्याला भेटतो आणि त्याच्यासोबत सेल्फी देखील काढतो.
तसेच सचिन यादरम्यान एका शाळेत जाणाऱ्या मुलीला देखील भेटतो आणि कौतुकाने तिच्या पाठीवर थाप मारतो. सचिनने हा व्हिडीओ स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

 


हेही वाचा :

…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही; अंबादास दानवेंची खोचक टीका