घरमहाराष्ट्रवाझेच्या हृदयातील रक्तवाहिन्यात ९० टक्के ब्लॉकेजेस; वकील वैद्यकीय मदतीची मागणी करणार

वाझेच्या हृदयातील रक्तवाहिन्यात ९० टक्के ब्लॉकेजेस; वकील वैद्यकीय मदतीची मागणी करणार

Subscribe

मुंकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडेलली स्फोटाकांनी भरलेली स्कॉर्पिओ प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सचिन वाझेच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आज न्यायालयात वाझेंचे वकील आबाद पोंडा वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मागणी करणार आहेत.

सचिन वाझेची NIA कोठडी शनिवारी म्हणजे आज संपत आहे. त्यामुळे आज वाझेला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. सचिन वाझेच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. वाझेवर वेळीच उपचार नन केल्यास धोका होऊ शकतो. त्यामुळे आता विशेष न्यायालय काय निर्देश देणार, हे पाहावं लागेल.

- Advertisement -

मागील आठवड्यात सचिन वाझेची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी जे.जे रुग्णालयात हलवण्यात आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास NIA च्या अधिकाऱ्यांनी वाझेला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री १.३० च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आलं. यापूर्वीही चौकशीदरम्यान दोन-तीन वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -