Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Sachin Vaze Case: सचिन वाझेच्या मिस्ट्री वुमनची साडे सात लाखांची बाईक NIAच्या...

Sachin Vaze Case: सचिन वाझेच्या मिस्ट्री वुमनची साडे सात लाखांची बाईक NIAच्या हाती

Related Story

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्या प्रकरणी सचिन वाझे याची मिस्ट्री वुमन (Mystery Woman) म्हणजेच मीना जॉर्जला (meena george)काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात गाड्या एनआयएने जप्त केल्या होत्या. पण आता सचिन वाझे प्रकरणात आणखी एका स्पोर्ट्स बाईकची एन्ट्री झाली आहे. एनआयएने ही आठवी गाडी ताब्यात घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे सचिन वाझेची मिस्ट्री वुमन मीना जॉर्ज हिच्या नावावर ही गाडी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात या गाडीची नेमकी भूमिका काय आहे हे अद्याप समजून आले नाही आहे.

आज सकाळी एनआयएने एक टेम्पो एनआयएच्या कार्यालयात आणला. या टेम्पोतून काही साहित्य आणले गेले आहे. याच टेम्पोमध्ये आठवी गाडी बाईक असून ती मीना जॉर्जच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. या बाईकची किंमत जवळपास साडे सात लाख इतकी आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या बाईकचा रोल अद्याप समजू शकला नाही. मात्र सचिन वाझे प्रकरणाशी संबंधित असल्याने ही बाईक एनआयएने ताब्यात घेतली आहे. ही बाईक दमन येथून ताब्यात घेण्यात आली आहे. यापूर्वी दमन येथून वोल्वो कार जप्त करण्यात आली होती.

- Advertisement -

सचिन वाझेचे काळे पैसे पांढरे करण्याचे काम मीना जॉर्ज करत होती. दोन आयडींवरुन हे काम ती करत होती. नोटा मोजायची मशीन देखील याच महिलेजवळ होती. तसेच, ट्रायडेंट हॉटेलच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये जी महिला दिसली ती हीच होती, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. मीरारोडमध्ये राहणाऱ्या पियुष गर्ग यांच्या सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स सी विंग ४०१ या रुममध्ये ती राहत होती. १५ दिवसांपासून ही महिला गायब होती. या महिलेचा तपास NIA गेले काही दिवस करत होते.


- Advertisement -

हेही वाचा – सचिन वाझेंची मैत्रीण मीना जॉर्ज होती देश सोडण्याच्या तयारीत


 

- Advertisement -