घरताज्या घडामोडीसचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाही - मुख्यमंत्री

सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाही – मुख्यमंत्री

Subscribe

फाशी देऊन मग तपास ही पद्धत चालणार नाही - मुख्यमंत्री

आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला यंत्रणा आहे. तपास यंत्रणा सगळ्यांकडेच आहे. जर त्यांची तपास यंत्रणा सक्षम असेल तर सगळा कारभार यांनाच करूद्या. विरोधकांना सगळे कागदपत्रे मिळालीत म्हणजे इथल्या इथे निर्णय असे होत नाही अशी स्पष्टोक्ती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणाकडे निष्पक्षपणे बघण्याची गरज आहे. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे या अधिकाऱ्याला का लटकवत आहात ? त्यांनी अर्णब गोस्वामीला घरातून उचलून नेले म्हणून ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजताना त्यांनी हा संवाद साधला. एखाद्याला फाशी देऊन चौकशी करण्यापेक्षा, चौकशी न करता फाशी देण्याची पद्धत जर विरोधक बदलत असतील तर तसे जाहीर करावे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विरोधकांना जे पुरावे मिळाले त्यांनी आम्हालाही द्यावेत त्याचा तपास करू असेही ते सीडीआर प्रकरणावर म्हणाले. सचिन वाझे हे एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र २००८ नंतर त्यांची कोणत्याही प्रकारची पक्षाची नोंदणी किंवा सदस्यत्व नाही. म्हणून सचिन वाझे यांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाही. त्यामुळेच या प्रकरणात विशिष्ट राजकीय पद्धतीने बघण्याची गरज नाही. या प्रकरणात सचिन वाझेला का लटकवता आहात ? असेही ते म्हणाले. खासदार मोहन डेलकर कुटुंबीय मंगळवारी येऊन भेटले आहेत. त्यांचे व्यवस्थित स्टेटमेंट घेतले गेले. या प्रकरणात राजकीय चष्म्यातून बघीतले असते, तर गुन्हा दाखल करून घेतला असता. तारतम्य आमच्याकडे आहे, त्यांच्याकडे नाही. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणातील सीडीआर हा तपास यंत्रणेचा भाग, निर्णय देणे हा कोर्टाचा भाग असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

शेवटी हत्या, आत्महत्या गंभीर नोंद घेणे सरकारचे काम आहे, त्यानुसारच मोहन डेलकर आत्महत्या पूर्वी सुसाईड नोटमध्ये नाव सभागृहात सांगितली. या प्रकरणातील तपास सुरू झाला आहे. जिलेटीन प्रकरणातील तपास सुरू असतानाच आधी फाशी द्या, मग तपास अशी विरोधकांची भूमिका आहे. मनसुख हिरेन प्रकरणात तपासाला दिशा देण्याचे काम कुणी करू नये, ही सरकारची पद्धत नाही असेही मुख्यमंत्र्यांनी खडसावले. एखाद्याला टार्गेट करायचे काम सुरू आहे. तपास सुरू आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणारच असेही मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात जो कोणी सापडेल, त्याला दयामाया दाखवली जाणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -