Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुरावे तयार, आता वस्त्रहरण अटळ; नितेश राणेंचा अनिल परबांवर नाव न घेता...

पुरावे तयार, आता वस्त्रहरण अटळ; नितेश राणेंचा अनिल परबांवर नाव न घेता निशाणा

Related Story

- Advertisement -

निलंबित पोलीस साहायक सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंनी पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचं खंडन केलं. यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. पुरावे तयार आहेत, आता वस्त्रहरण अटळ आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा, असं म्हटलं आहे. तसंच त्यांनी परिवार मंत्री असा उल्लेख केला आहे. “ओ परिवार मंत्री..शपथ काय घेता..शेंबूड पुसा..राजीनामा दया आणि चौकशी ला सामोरे जा..पुरावे तयार आहेत..आता वस्त्रहरण अटळ आहे!!” असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

- Advertisement -

माझ्यावरील आरोप खोटे

बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले आहेत”, असं अनिल परब म्हणाले. गेले २-३ दिवस भाजपाचे पदाधिकारी आरडा-ओरडा करत होते की आता (संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर) आम्ही तिसरा बळी घेऊ. म्हणजे त्यांना काही दिवसांपासून या गोष्टीची कल्पना आहे. त्यांनी हे प्रकरण सरकारला बदनाम करण्यासाठी तयार केलं आहे. सचिन वाझे आज पत्र देणार होते, याची कल्पना बहुतेक त्यांना आधीच असेल, असा दावा अनिल परब यांनी केला.


- Advertisement -

हेही वाचा – माझ्यावरील आरोप खोटे; मला आणि सरकारला नाहक बदनाम करण्याचा भाजपचा डाव – अनिल परब


 

- Advertisement -