घरताज्या घडामोडीSachin Vaze : ...असं झाल्यास सचिन वाझे फरार होईल, NIA कडून कोर्टात...

Sachin Vaze : …असं झाल्यास सचिन वाझे फरार होईल, NIA कडून कोर्टात भीती व्यक्त

Subscribe

लवकर बरे होण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात लवकर बरे होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात यावा.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक केलेल्या सचिन वाझेंवर काही दिवसांपुर्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढील उपचार त्यांच्या घरी करण्यात यावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर एनआयए तपास यंत्रणेने विरोध केला आहे. सचिन वाझेंच्या याचिकेवर न्यायालयात एनआयएने आपली भूमिका व्यक्त करताना सचिन वाझे फरार होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे. सचिन वाझेला घरी नेऊन तात्पुरतं नजरकैदेत ठेवल्यास वाझे फरार होईल असे एनआयएने कोर्टात सांगितले आहे. सचिन वाझेला मार्च २०२१ मध्ये अटक करण्यात आली आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक केली आहे. सचिन वाझे यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात बायपास सर्जरी करण्यात आली आहे. सचिन वाझेंना रुग्णालयात उपचार करण्याची याचिका न्यायालयाने मान्य केली होती. परंतु आता आपल्याला तात्पुरत्या नजरकैदेत ठेवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सचिन वाझेनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. परंतु या याचिकेला एनआयएने विरोध केला आहे. सचिन वाझेला घरी तात्पुरत्या नजरकैदेत ठेवल्यास ते फरार होऊ शकतात अशी भीती एनआयएने व्यक्त केली आहे. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, यानुसार मुंबई सेंट्र्ल येथील वोकहार्ट रुग्णालयात वाझेवर १४ सप्टेंबरला ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

- Advertisement -

सचिन वाझेनी न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे की, तळोजा कारागृहात पाठवण्यात येऊ नये कारण तिकडे त्यांना उपचारानंतरचा प्राथमिक उपचार मिळणार नाही यामुळे अधिक संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लवकर बरे होण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात लवकर बरे होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात यावा. तीन महिने तात्पुरत्या नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी देखील सचिन वाझेकडून करण्यात आली आहे. घरी असताना आपल्या वकिलासोबत चर्चा करण्याचीही परवानगी देण्यात यावी अशी मागणी सचिन वाझेनी याचिकेत म्हटलं आहे.

एनआयएचा विरोध

सचिन वाझेनी मुंबई न्यायालयात केलेल्या याचिकेला एनआयएने विरोध केला आहे. सचिन वाझे याला घरी नजरकैदमध्ये ठेवण्याची परवानगी देऊ नये असं केल्यास फरार होण्याची भीती आहे. तळोजा कारागृहाच्या संलग्न मुंबईतील रुग्णालये वाझेंची काळजी घेण्याबाबत सर्व सक्षम सुविधांसह पू्र्णपणे सक्षम आहेत. सचिन वाझेने केलेल्या याचिकेवर न्यायालयानं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पाडली त्यावेळी वाझेच्या एनआयएने विरोध केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट झालं नसल्याने सेंट्रल व्हिस्टावर केलं, काँग्रेसचा मोदींना टोला


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -