घरताज्या घडामोडीसचिन वाझे NIAच्या कोर्टात पोहोचले

सचिन वाझे NIAच्या कोर्टात पोहोचले

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारी रोजी आढळली. त्यानंतर याप्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले. या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली. त्यानंतर याप्रकरणाच्या सुरुवातील तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप करण्यात आला. काल (शनिवार) अखेर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केली. आज (रविवार) सचिन वाझे यांना एनआयएच्या स्पेशल हॉलिडे कोर्टात पोहोचले आहेत. पण कोर्टात हजर होण्यापूर्वीच सचिन वाझे यांची प्रकृती सकाळी खालावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना जे.जे रुग्णालयात तपासणीकरता येण्यात आले होते. सचिन वाझेंवर उपचार झाले आहेत.

आज सकाळी सचिन वाझे यांची अचानक प्रकृती बिघडली. माहितीनुसार, वाझे यांना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवली. त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना जे.जे रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. मग त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना एनआयए कार्यालयात आणण्यात आले होते. आता सचिन वाढे एनआयएच्या कोर्टात दाखल झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान काल सचिन वाझे यांची एनआयएने तब्बल १३ तास कसून चौकशी केली. त्यानंतर वाझे यांना अटक करण्यात आली. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाझेंना कोर्टात हजर झाले असून कोर्ट वाझे विरोधात काय सुनावणी देणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – पोलिस अधिकारी असूनही ‘या’ कंपन्यांचे संचालक आहेत सचिन वाझे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -