घरमहाराष्ट्रसचिन वाझे ते दया नायक- एन्काऊंटर स्पेशलिस्टस ते आरोपी

सचिन वाझे ते दया नायक- एन्काऊंटर स्पेशलिस्टस ते आरोपी

Subscribe

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी मुंबई पोलीस क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. कोणे एकेकाळी वाझे हे मुंबई पोलिसांच्या टॉप एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी ६० हून अधिक एन्काऊटर केले आहेत. पण वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

Sachin vaze arrested by the national investigating agency
सचिन वाझे

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे नाव कोणाला माहित नाही असा शोधूनही कोणी सापडणार नाही. शर्मा यांच्या नावावर १०० हून अधिक एन्कांऊटरची नोंद आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या सांगण्यावरून शर्मा यांनी अनेकांचा एन्काऊंटर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच २००६ साली लखन भैय्या नावाच्या आरोपीच्या एन्काउंटरवरून देखील शर्मा यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

वाझे यांच्याप्रमाणेच एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या दया नायक यांचीही कारकिर्द वादग्रस्त आहे. नायक यांनी ८३ एन्काऊंटर केले असून त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही आहेत. उत्पन्नापेक्षा जास्त संपती बाळगल्याचा आरोप नायक यांच्यावर असून अंडरवर्ल्डशीही त्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या यादीत विजय साळसकर हे नाव देखील आहे. ८० एन्काऊंटर त्यांच्या नावावर आहेत. मुंबईचा डॉन अरुण गवळी .याच्या अनेक शूटर्सचा एन्काऊंटर साळसकर यांनी केला होता. गुटखा इंडस्ट्रीतील अनेक बड्या उद्योगपतींबरोबर लागेबांधे असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्याकडून सरकारी पिस्तुल काढून घेण्यात आले होते. 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात कसाब व त्याच्या साथीदाराचा सामना करताना साळगावकर शहीद झाले होते.

एके काळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट रविंद्रनाथ आंग्रे हे नाव घेतले तरी भल्याभल्या गुन्हेगारांची झोप उडायची. २००८ साली गणेश वाघ या बिल्डरने आंग्रे यांच्यावर धमकीचा, खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर आंग्रे यांना जेलमध्ये जावे लागले.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -