घरमहाराष्ट्रसचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक...

सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

Subscribe

महाविकास आघाडीच्या काळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी रुपयांचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. त्यावरून अनिल देशमुख आणि सचिन वाझे सध्या पोलीस तुरुंगात आहेत. त्यावरूनच सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी दर महिन्याला पाठवायचे असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. 

मुंबई – ५० खोके एकदम ओके असे नारे देत शिवसेनेने विधिमंडळातील पावसाळी अधिवेशन दणाणून सोडले होते. भाजपाकडून ५० कोटी रुपये घेऊन सेनेतील आमदार शिंदे गटात गेल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. मात्र, आता यावर शिंदे गटातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रतापराव जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी रुपये याचे असा गंभीर आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. गुलाबराव पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्ह्यात दाखल झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वागत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रतापराव जाधव बोलत होते.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मोठी फूट, ५०० कोळी बांधव करणार शिंदे गटात प्रवेश

- Advertisement -

कार्यकर्त्यांच्या वाळूच्या गाड्या पकडल्या आणि पत्त्यांच्या क्लबवर धाड पडली, वाईट काम असलं तरी आम्हालाच फोन करावा लागतो, असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे कधी पोलीस ठाण्याची पायरी चढले आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाहीतर सचिन वाझे दर महिन्याला ‘मातोश्री’वर 100 खोके पाठवायचा, असा गंभीर आरोपही त्यांनी ठाकरेंवर केला आहे. आमच्यावर ५० कोटींचा आरोप करणाऱ्यांनी मातोश्रीवरील १०० कोटींवर बोला, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हेही वाचा – महात्मा गांधींची आज १५३ वी जयंती, पंतप्रधान मोदींनी भारतीयांना केले महत्त्वाचे आवाहन

- Advertisement -

५० खोक्यावरून शिवसेनेने रान पेटवले होते. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून शिंदे गटावर निशाणा साधला होता. मात्र, यावरून शिंदे गटातून काहीच प्रत्युत्तर आले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शांत बसण्याचं आवाहन केलं होतं, म्हणून आम्ही शांत होतो. पण जीवावर बेतलं की आम्ही बोलणारच असा इशाराही प्रतापराव जाधव यांनी केला आहे. दरम्यान, प्रतापराव जाधव यांनी केलेला आरोप खरा की खोटा हे येत्या दिवसात स्पष्ट होईलच.

महाविकास आघाडीच्या काळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी रुपयांचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. त्यावरून अनिल देशमुख आणि सचिन वाझे सध्या पोलीस तुरुंगात आहेत. त्यावरूनच सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी दर महिन्याला पाठवायचे, असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा – आजपासून टॅक्सी-रिक्षाचा प्रवास महागला, जाणून घ्या नव्या किमती

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -