घरताज्या घडामोडीअनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

Subscribe

अनिल देशमुख यांच्याविरोधात ५९ पानांचे आरोपपत्र दाखल.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीबीआयने (CBI) त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. १०० कोटी वसुलीप्रकरणी ५९ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यांना मुख्य आरोपी दाखवण्यात आले आहे. तसेच, देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना सहआरोपी दाखवण्यात आले आहे.
१०० कोटी वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सीबीआय कोर्टात (CBI court) सुनावणी सुरू होती. मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सचिन वाझे (Sachin Vaze) याने आपल्याला माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर २५ मे रोजी झालेल्या सुनावणीत सीबीआयने त्याचा अर्ज स्विकारला. तसेच, १ जूनला न्यायालायनेही अर्जावर आदेश देत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवले.

२० मार्च २०२१ रोजी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील हॉटेल्स चालकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने प्राथमिक तपास केला. या तपासादरम्यान देशमुखांच्या अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
दरम्यान, मनी लॉन्ड्रींग प्रकरण आणि काळा पैसा परदेशात पाठवल्याप्रकरणी सीबीआयने चौकशी केली असता त्यात ते दोषी आढळले. यावरून ईडीने देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
तसेच, वाझेला माफीचा साक्षीदार बनवल्याने अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -