Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सचिन वाझेंच्या ३ मालकांना एकच चिंता ...फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

सचिन वाझेंच्या ३ मालकांना एकच चिंता …फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकार आणि भाजप यांच्यात रोजच कलगीतुरा रंगत आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही फडणवीस यांनी वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की तो एनआयला काय सांगेल. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. असा टोला हाणला आहे.

वाझे प्रकरणामुळेच महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी झाली. आता नवाब मलिक चिंतेत आहेत. कारण फोन टॅपिंग प्रकरणामुळे अनेकांची नावे बाहेर येणार आहेत. असेही फडणवीस यांनी म्हटले असून नवाब मलिक यांनीच रिपोर्ट फोडल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. पण त्याचबरोबर याची दलाली कोणी खाल्ली बदल्या कोणी केल्या ज्यांनी वाझेंना परत सेवेत घेतले त्यांनी मुंबई पोलिसांची नाव झालं की बदनामी ?असा सवाल करत फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.


- Advertisement -

 

- Advertisement -