घरताज्या घडामोडीसचिन वाझेंची मैत्रीण मीना जॉर्ज होती देश सोडण्याच्या तयारीत

सचिन वाझेंची मैत्रीण मीना जॉर्ज होती देश सोडण्याच्या तयारीत

Subscribe

१३ तासांच्या चौकशीनंतर NIA ने बुरख्यासह नेले मुख्यालयात

मुकेश अंबानी स्कॉर्पिओतील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंसोबत जोडली जाणारे नाव म्हणजे मीना जॉर्ज. या संपुर्ण प्रकरणातील ही मिस्ट्री वुमन कोण असा सवाल सध्या केला जात आहे. पण याच मिस्ट्री वुमनच्या चौकशीचा सपाटा सध्या नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) मार्फत लावण्यात आला आहे. मीना जॉर्ज या महिलेच्या मीरा रोड येथील घरात एनआयएची टीम गुरूवारी संध्याकाळी पोहचली. मीरा रोडच्या सेवेन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये सी विंगमध्ये फ्लॅट नंबर ४०१ मध्ये राहणाऱ्या मीना जॉर्जच्या घरावर एनआयएच्या टीमने गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास छापा टाकला. त्यानंतर या मिस्ट्री वुमन म्हणजे मीना जॉर्जची चौकशी तब्बल १३ तास सुरू होती. या चौकशीतील सचिन वाझे प्रकरणातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मीना जॉर्जआधीच गुजरातमधील एका व्यापाऱ्याला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या व्यापाऱ्याने सचिन वाझेला १४ सीमकार्ड पुरवल्याची एनआयएची माहिती आहे.

कसा आहे घटनाक्रम ?

मीरा रोडच्या सेवेन इलेव्हन कॉम्प्लेक्समधील सी विंगमधील ४०१ क्रमांकाचा फ्लॅट हा मीना जॉर्ज यांनी भाडेतत्वावर घेतला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून हा फ्लॅट बंद होता अशी माहिती आहे. हीच ती महिला आहे जी १६ फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती, असा एनआयए टीमचा दावा आहे. सचिन वाझे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक अशी या महिलेची ओळख आता समोर येऊ लागली आहे. त्याशिवाय सचिन वाझे यांचे संपुर्ण आर्थिक व्यवहार हे मीना जॉर्ज सांभाळत होत्या, अशी माहिती आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या पैशांच्या बॅगा या ट्रायडंट हॉटेलमध्ये गेल्यानंतर सचिन वाझेंपाठोपाठ दिसलेली महिला ही मीना जॉर्ज हीच होती. सचिन वाझेंसाठी काम करणाऱ्या या मैत्रीणीने पैसे मोजण्याची मशीनही वाझेंना पुरवल्याची माहिती प्रसारमाध्यमांकडून मांडण्यात आली होती. एनआयएकडून मीना जॉर्ज यांना मुंबई एअरपोर्टवरूनच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर मीना जॉर्ज यांच्या घरी मिरारोड येथील घरी चौकशीसाठी नेण्यात आले. मीना जॉर्ज या महिलेच्या घरी तब्बल १३ तास चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. गुरूवारी सायंकाळी दाखल झालेली टीम तब्बल १३ तासांनंतर सेवेन इलेव्हन कॉम्प्लेक्समधून सकाळी ७ नंतर बाहेर पडली. ज्यावेळी एनआयएची टीम बाहेर पडली तेव्हा, मीना जॉर्ज यांच्या चेहऱ्यावर बुरखा होता. या प्रकरणातील संशयित म्हणून मीना जॉर्ज यांना एनआयएच्या टीमने एनआयए मुख्यालयात आज शुक्रवारी सकाळी नेले. या संपुर्ण प्रकरणात एनआयएकडून आतापर्यंत एकच आरोपी म्हणजे सचिन वाझे याला एनआयएने आतापर्यंत या प्रकरणात अटक केली आहे. एनआयएची टीम जेव्हा गुरूवारी मिरारोड येथील सेव्हेन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये दाखल झाली, त्यावेळी टीमकडून मीना जॉर्ज यांच्या चौकशीसाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी काढण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मीना जॉर्जच्या घरी संपुर्ण रात्रभर अशी १३ तास चौकशी या प्रकरणात सुरू होती.

- Advertisement -

NIA ने मीना जॉर्ज यांना का घेतले ताब्यात ?

या संपुर्ण प्रकरणात मीना जॉर्ज फेब्रुवारीमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्या होत्या. त्यानंतर दोन दिवस सचिन वाझेंसोबत मीना जॉर्ज यांचा मुक्काम असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले होते. सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील माहितीची उलगडा होऊ लागल्यानंतरच मीना जॉर्ज अचानक गायब झाल्या होत्या. गेल्या पंधरवड्यात त्या आपल्या मिरारोड येथील घरातली आल्या नसल्याची माहिती आहे. म्हणूनच एनआयएची टीमदेखील त्यांच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. मुंबई एअरपोर्टला येताच एनआयएच्या टीमने मीना जॉर्जला गाठले. त्यानंतर मीना जॉर्जला चौकशीसाठी राहत्या घरी चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी कोर्टाची विशेष परवानगी एनआयएने घेतली होती असते समजते. कोणत्याही प्रकरणात महिलांची रात्री उशिरा चौकशी पोलिसांकडून करण्यात येऊ नये यासाठीच न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळेच या प्रकरणात न्यायालयाकडून एनआयएने परवानगी काढली होती असे समजते. मीना जॉर्ज या देश सोडणार असल्याची खात्रीलायक माहिती एनआयएला मिळाली होती. त्यामुळे त्या पुन्हा एकदा फरार होऊ शकतात, हाच संशय आल्यानेच एनआयएच्या टीमने सापळा लावला होता. या सापळ्यात मीना जॉर्ज नेमक्या सापडल्या. त्यानंतर एनआयएच्या टीमने त्यांना मुंबई एअरपोर्टवर ताब्यात घेत, पुढे चौकशीसाठी मिरारोड येथील घरी नेले. त्यानंतर १३ तासांच्या चौकशीनंतर एनआयएची टीम मीना जॉर्ज यांना घेऊन एनआयए मुख्यालयाकडे निघाली. मुख्यालयात नेताना मीना जॉर्ज यांचा चेहरा बुरख्याने झाकण्यात आला होता.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -