घरताज्या घडामोडीअनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?, सचिन वाझे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?, सचिन वाझे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार आहे. सचिन वाझेच्या अर्जावर ३० मो रोजी सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. सचिन वाझेनी भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला सीबीआयनेसुद्धा होकार दिला आहे. यामुळे आता सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनसुख हिरेन आणि वसुलीच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचे वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सचिन वाझेचाही या प्रकरणामध्ये संबंध आहे. अनिल देशमुख स्वतः १०० कोटी रुपये वसुली प्रकरण आणि मनी लाँड्रिगं प्रकरणात जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केले आहेत. सचिन वाझेंचे सीबीआय कोर्टासमोर साक्ष होणार आहे. यामध्ये सचिन वाझे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

मनी लाँड्रिग प्रकरणात राज्याच्या दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली शिवसेना नेते अनिल परब, यशवंत जाधव, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्यार ईडी कारवाई सुरु आहे.

- Advertisement -

पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचा परबांवर आरोप 

अनिल परब यांच्यावर पोलिसांच्या बदल्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सचिन वाझेने केले आहेत. अनिल देशमुख आणि अनिल परब यांना पोलीस बदल्यांमधील पैसे दिले असल्याचा जबाब सचिन वाझेने दिला आहे. यामुळे अनिल परब अडचणीत आले आहेत. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.


हेही वाचा : परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर, शासकीय आणि खासगी निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -