घरताज्या घडामोडीनाशिक महापालिकेचे माजी आयुक्त भास्कर सानप यांचं निधन

नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त भास्कर सानप यांचं निधन

Subscribe

विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि मनमिळावू स्वभावामुळे सानप सर्वांना परिचित

नाशिक महानगरपालिकेचे माजी आयुक्त भास्कर सानप यांचं शनिवारी (दि. ४) अल्पशः आजाराने निधन झालं. निवृत्तीनंतर ते औरंगाबाद शहरात स्थायिक झाले होते. रविवारी (दि.५) सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल.

नाशिकमधील आयुक्तपदाचा त्यांचा कार्यकाळ चर्चेत राहिला. ऐन पालिका निवडणुकीच्या काळात राज्य शासनाने त्यांची बदली केल्यानंतर कॅटमध्ये जाऊन त्यांनी बदली रद्द करुन आणली होती. बदली रद्द करण्यासाठी कॅटमध्ये प्रथमच एका पालिका आयुक्ताने सरकारविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यातही राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कौल मिळवत सानप यांनी इतिहास रचला होता. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारने ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून बदली केली होती. या बदलीमुळे चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, अतिशय मनमिळावू स्वभावाचे भास्कर सानप यांचा जनसंपर्कही दांडगा होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले. दरम्यान, पालिका आयुक्तपदापूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातही ते कार्यरत होते. २०१७ मध्ये शहर बससेवा एसटी महामंडळानेच चालवावी, यासाठीही ते आग्रही होती. खत प्रकल्पात जीटीझेड प्रकल्प सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -