“युपीचा बाबू ४४ मते घेऊन गेला, वाघाचे कातडे पांघरलेला बाबू ४१ मतांवरच थांबला”

राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. तर, काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. 

Sadabhau Khot, Shivajirao Garje's candidature application withdrawn

उत्तर प्रदेशचा बाबू 44 मते घेऊन गेला अन वाघाचे कातडे पांघरलेला संजय बाबू 41 मतांवरच थांबला. मग आता नाही का महाराष्ट्राचा अपमान तुम्हाला झोंबला? असे ट्विट करत सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. (SadaBhau Khot commented on Sanjay Raut)

राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. तर, काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं.

हेही वाचा – शिवसेनेचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार, संभाजीराजे समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

राज्यसभेची चुरशीच्या झालेल्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक रंगणार आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. तर, दुसरीकडे भाजपाकडून विधान परिषदेसाठी पाच नावे जाहीर करण्यात आली आहेत. उमा खापरे यांचा अर्ज भरण्यात आला आहे.

हेही वाचा – संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला, किरीट सोमय्यांचा आरोप

विधान परिषदेसाठी पाचव्या जागेसाठी भाजपकडून सदाभाऊ खोतांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ती जागा उमा खापरे यांना मिळाली. त्यामुळे सदाभाऊ खोतांना अपक्ष अर्ज भरला. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे खापरेंनी उमेदवारी कायम ठेवली तर खोतांना ही निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे सदाभाऊ खोत आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.