Homeताज्या घडामोडीSadabhau Khot : बीड प्रकरणी न्याय निश्चित होणार पण...; सदाभाऊ खोत यांचं...

Sadabhau Khot : बीड प्रकरणी न्याय निश्चित होणार पण…; सदाभाऊ खोत यांचं मोठं वक्तव्य

Subscribe

देवाच्या काठीला आवाज नसतो. त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण न्याय निवाडा निश्चित होणार आहे, असं वक्तव्य करत रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला.

मुंबई : देवाच्या काठीला आवाज नसतो. त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण न्याय निवाडा निश्चित होणार आहे, असं वक्तव्य करत रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला. बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विरोधकांनी मूक मोर्चा काढला. यावेळी वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणी विरोधकांनी धरून ठेवली. (sadabhau khot on beed case belief in devendra fadnavis he will definately take action)

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदाभाऊ खोत म्हणाले की, “बीडमध्ये अमानुष पद्धतीने सरपंचाचा खून करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मनं सुन्न झालीत. पण देवाच्या काठीला आवाज नसतो. त्याप्रमाणे राज्यात देवाभाऊंचं सरकार असून त्यांच्याही काठीला आवाज नाही. मात्र, न्याय निवाडा हा निश्चित होईल. तसेच, आरोपी पकडले जातील त्यादिवशी त्यांना या मांडवाखालून जावेच लागणार आहे. बीडमधील ही केस फास्ट टॅग कोर्टात चालवावी. राज्य शांततामय चालवायचं असल्यास जनतेला शांततामय व्यवस्था द्यावे लागेल, तरच जनता आपल्यावर विश्वास ठेवेल. पण सरकारच्या तपासात जे येतील त्यांच्यावर कारवाई होईल. सध्या बीड घटनेचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात विविध लोक आणि संघटना काम करत असतात. समाजात गुन्हेगारी वाढू नये म्हणून ते काम करत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली आहे. आपल्याला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत”, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


हेही वाचा – Suresh Dhas : मुख्यमंत्र्यांसमोर झोळी पसरतो, भीक मागतो, माझी आर्तकिंकाळी आहे…; सुरेश धस असं का म्हणाले….