एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक पगारवाढ, संप मात्र कायम ; गुरूवारी होणार निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेतला जाईल..

राज्य सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढी दिली असली तरी एसटी कर्मचाऱ्यांनी अजूनही संप मागे घेतलेला नाहीये. परंतु एसटीचा तिढा अद्यापही कायम असून विलिनीकरणाबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेतला जाईल, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. तसेच हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान, नाशिक, पुणे आणि सिंधुदुर्गमध्ये अद्यापही सुरू आहे. विलिनीकरणाशिवाय एसटीचा संप मागे घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. आजचा मुक्काम आझाद मैदानावर करू उद्या संपावर निर्णय घेऊ, असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं. परंतु अनिल परब यांनी ऐतिहासिक वेतनवाढ करत अद्यापही विनीकरणाबाबत निर्णय घेतलेला नाहीये. परंतु सरकारने दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तर ऐकून घेतला आहे. त्यामुळे आझाद मैदानात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पुढची भूमिका जाहीर करू असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी वेगळं मत मांडू नये आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो विचारविनीमय पद्धतीने घेतला जाईल. असं सदाभाऊ खोत म्हणाले.

सरकारचा निर्णय ऐकल्यानंतर आम्ही आता कामगारांसोबत बसून चर्चा करणार आहोत. त्यानंतर आमची भूमिका ठरवणार आहोत. आम्ही सर्व कामगारांच्या बाजूचा विचार करत उद्या जाहीर निर्णय घेऊ. परंतु आमची भूमिका जाहीर झालेली नाहीये. असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. परंतु विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयीन समितीच्या पुढे असल्यामुळे संपामध्ये तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना २ ते ५ हजार रुपयांची पगारवाढ जाहीर करण्यात आली आहे.

सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर कामगारांची नाराजी

एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरण करावं ही मागणी आहे. परंतु सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पगारवाढीला आमची मान्यता नाहीये. अशा प्रकारची नाराजी आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे.


हेही वाचा: Legislative Council Election : निवडणुकीच्या आचार संहितेमुळे विकास कामाचा प्रस्ताव रखडला, एकही प्रस्ताव मंजूर