घरमहाराष्ट्रRohit Pawar : आमदार, राजकीय कुटुंब फोडण्यासाठी सागर बंगला; पवारांचा फडणवीसांवर थेट...

Rohit Pawar : आमदार, राजकीय कुटुंब फोडण्यासाठी सागर बंगला; पवारांचा फडणवीसांवर थेट आरोप

Subscribe

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठ आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर विरोधकांनी फडणवीसांच्या चौकशी मागणी केली आहे. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी सागर बंगला कुठेच दिसत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. (Sagar Bangla to break MLA and political family Rohit Pawars direct accusation against Devendra Fadnavis)

हेही वाचा – NCP-SP : फडणवीसांची ताबडतोब चौकशी करावी; जरांगेंच्या आरोपानंतर शरद पवार गटाची मागणी

- Advertisement -

पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, सागर बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी आहे. सागर बंगला आमदारांना वाचवण्यासाठी आहे. सागर बंगला हा राजकीय कुटुंब फोडण्यासाठी आहे. मात्र सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी सागर बंगला कुठेच दिसत नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्याशिवाय इतर खात्यात जास्त वेळ देण्याची गरज आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा जास्त अन्याय सामान्य नागरिकांवर आपल्या राज्यात होतो आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि संस्कृती खराब करण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच रोहित पवार म्हणाले की, पैशाचा वापर करून त्यांनी एकता समानता नष्ट केली. जातीवाद व धर्मवादाला 2014 नंतर राज्यात चालना मिळाली गेली. लोकांच्या प्रश्नांपेक्षा वादावर अधिक चर्चा फडणवीस करतात. पक्ष फोडले, कुटुंबे फोडली, असे सांगत रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी “तुतारी”वरून टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सेलिब्रिटी आमदार म्हणत चिमटा काढला.

- Advertisement -

हेही वाचा – MVA : ‘बिन बुलाए मेहमान’ होणार नाही; जागावाटपाच्या मुद्द्यावर वंचितचा मविआला इशारा

मनोज जरांगे फडणवीसांवर गंभीर आरोप

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी सरकारला शिव्या दिल्या त्याचा त्यांना राग आहे. त्यामुळे मला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जे-जे त्यांच्याविरोधात गेले त्यांना ते संपवत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना जर माझा बळी पाहिजे असेल तर ही बैठक संपल्यानंतर मी पायी चालत सागर बंगल्यावर येतो. तिथे माझा बळी घ्या, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांना माझा राग येतो. ते माझं उपोषण सोडायला येणार होते, मात्र मी त्यांना येऊ दिले नाही, याचा त्यांना राग आहे. ते माझ्याविरोधात ब्राम्हणी कावा रचत आहेत. पण मी त्यांचे सर्व डाव उघडे करणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -