Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'साहेब आम्हाला शिकवू द्या हो! शिक्षकांना बीएलओची कामे नकोत'; शिक्षकांची आर्त हाक

‘साहेब आम्हाला शिकवू द्या हो! शिक्षकांना बीएलओची कामे नकोत’; शिक्षकांची आर्त हाक

Subscribe

नाशिक : शैक्षणिक सत्राची नुकतीच सुरुवात झाली असून, शिक्षकांना सेतू अभ्यास, पायाभूत चाचणी, निपुण चाचणी अशा विविध परीक्षा घ्याव्या लागत आहेत. नवभारत साक्षरता मिशन योजनेंतर्गत निरक्षर लोकांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करणे. शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे, विद्यासमिक्षा अहवाल, प्रशस्त अ‍ॅपद्वारे अपंग मुलांची नोंद घेणे, वृक्षलागवड, परसबाग, ऑनलाईन कामे, पोषण आहार आदी कामांमध्ये शिक्षक पुरता अडकला आहे.

शिक्षक वर्ग सध्या त्याच्या मूळ कामापासून दूर ठेवून विविध अशैक्षणिक कामे लादली जात आहेत. यामुळे अध्यापनात अडथळा निर्माण होत असल्याने पालकांनी देखील शिक्षकांना देण्यात येत असलेल्या अशैक्षणिक कामांना विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मराठी शाळांमध्ये पालक आपल्या पाल्यांना दाखल करायला पुढे येत नाहीत, परिणामतः जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत आहे. त्यातच भर म्हणून तहसीलदारांनी नव्याने तालुक्यातील शिक्षकांना बीएलओचे आदेश दिले आहेत. यामुळे शिक्षकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शिक्षकांना या कामातून मुक्त करा व आम्हाला शिकवू द्या, ही कामे इतर आस्थापनाकडे द्या अशा आशयाचे निवेदन शिक्षक समन्वय समितीने शुक्रवारी (दि. ११) आमदार डॉ. राहुल आहेर यांना दिले. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले. याप्रसंगी शिक्षक समन्वय समितीचे विजय आहेर, संजय आहेर, अनंत देवरे, नितीन आहेर, योगेश देवरे, दिपक देवरे, नंदू आहेर, निर्मला मोरे,संगीता बिरारी, हर्षाली अहिरराव, जयश्री पगार आदी शिक्षक उपस्थित होते.

तालुक्यात इतरही आस्थापना जसे ग्रामपंचायत, तलाठी, आशासेविका, अंगणवाडी सेविका आदींना ही कामे करण्याचे आदेशित असताना प्राधान्याने शिक्षकांनाच वेळोवेळी कामे दिली जातात. विशेषतः महिला शिक्षकांनाही मोठ्या प्रमाणात बीएलओची कामे दिली आहेत. देवळा तालुक्यातील सर्व शिक्षकांनी ही कामे करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्याजागी दुसर्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे. : विजय आहेर, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, देवळा तालुका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -