Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र "साहेब, निर्णय मागे घ्या" नाशिकच्या कार्यकर्त्यांची आर्त हाक

“साहेब, निर्णय मागे घ्या” नाशिकच्या कार्यकर्त्यांची आर्त हाक

Subscribe

नाशिक : लोक माझें सांगाती या शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. यावेळी शरद पवार आभाराचे भाषण करत असताना जे काही बोलले त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि यामुळे त्यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांना मोठा धक्काच बसला

- Advertisement -

पवारांच्या या निर्णयामुळे फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर पक्षाच्या सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला आणि हा निर्णय तुम्ही मागे घ्या अशी मागणी केली.

दरम्यान, मुंबईत घडलेल्या या संपूर्ण नाट्याचे परिणाम आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असून पवार साहेब हा निर्णय मागे घ्या अशी आर्त हाक देत आहेत.

- Advertisement -

नाशिक मध्येही शरद पवारांचा हा निर्णय समजताच अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे जमायला सुरवात केली. याठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संभ्रमावस्थेत तर होतेच तसेच भावुक झाल्याचेही चित्र बघायला मिळाले. यावेळी मोठ्या प्रमाणात शरद पावरांच्या समर्थनार्थ ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -