घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर

नाशिकच्या प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर

Subscribe

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा मानाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२० नाशिकचे मराठमोळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी देशमुख यांना हा सन्मान मिळाला आहे. तसेच, त्यांचे संगीत देवबाभळी हे नाटक लोकप्रिय आहे.

दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. ताम्रपत्र, ५० हजार रुपये असे पुरस्कारचे स्वरुप आहे. २०२० चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार देशमुख यांना जाहीर झाला आहे. प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी या पुस्तकाला आत्तापर्यंत ३९ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारचा विजय तेंडुलकर पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. मराठीसोबतच बंगाली साहित्यासाठीचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. बंगाली लेखक श्याम बंद्योपाध्याय यांच्या पुराणपुरुष या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कर निवड समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर,आशा बागे आणि लक्ष्मीकांत देशमुख यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -