घरउत्तर महाराष्ट्रSahitya Sammelan : 72 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन अमळनेरात; आजपासून...

Sahitya Sammelan : 72 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन अमळनेरात; आजपासून सुरुवात

Subscribe

महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षाची निकड, संमेलनातील कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन आदी निकषयांकर निर्णय घेण्यात आले. या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदासाठी रवींद्र शोभणे यांच्या नाकाकर एकमत झाले. विशेष म्हणजे यावेळी साहित्य महामंडळाने साहित्यिकांचा सन्मान राखण्यासाठी साहित्य संस्थांनी अध्यक्ष पदासाठी सुचविलेली नावे जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता.

जळगाव : नुकत्याच पार पडलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानंतर आजपासून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात होत आहे. हे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमेळनेरध्ये आयोजित करण्यात आले असून, तब्बल 72 वर्षांनंतर हा योग आला आहे. कारण, 1952 सालानंतर पुन्हा एकदा अमेळनरात साहित्य संमेलन भरविले जात आहे हे विशेष. (Sahitya Sammelan After 72 years All India Maratha Sahitya Sammelan at Amalnerat Starting today)

महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षाची निकड, संमेलनातील कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन आदी निकषयांकर निर्णय घेण्यात आले. या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदासाठी रवींद्र शोभणे यांच्या नाकाकर एकमत झाले. विशेष म्हणजे यावेळी साहित्य महामंडळाने साहित्यिकांचा सन्मान राखण्यासाठी साहित्य संस्थांनी अध्यक्ष पदासाठी सुचविलेली नावे जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

सुमित्रा महाजनांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता प्रा.उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होणार आहे.

हेही वाचा : Mumbai Congress : सिद्दीकी पिता-पुत्र करणार काँग्रेसला रामराम; ‘हाता’वर बांधणार दादा गटाचं घड्याळ

- Advertisement -

तीन दिवस रंगणार सारस्वतांचा मेळा

आज 2 फेब्रुवारीपासून अमळनेरमध्ये सुरू होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पुढील काही वेळातच सुरुवात होणार आहे. यामुळे साहित्यिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या संमेलनाला साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस सारस्वतांचा मेळा अमेळनेरमध्ये जमणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -