साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांकडून चुकीची माहिती; पर्यावरण अधिकाऱ्यांचा खुलासा

sai resort officials reveal the wrong information given by kirit somaiya in the sai resort case

भाजप नेते किरीट सोमय्या मागील काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी सातत्याने नवे आरोप, दावे करत आहेत. हा रिसॉर्ट पर्यावरणासंबंधित नियम पायदळी तुडवत चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. तसेच हा रिसॉर्ट बांधल्यानंतर रिसॉर्टमधील पाणी थेट समुद्रात सोडल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मात्र पर्यावरण विभागाने याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सोमय्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे पर्यावरण अधिकाऱ्यांना आढळले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यालगत असलेले हे साई रिसॉर्ट गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडले. यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असून यातून पर्यावरणाची हानी होत असल्याचे ट्विट केले. तर यापूर्वीही त्यांनी हे रिसॉर्च असं अवैध आहे हे सिद्ध करण्याचे अनेक पुरावे सादर केले.

मात्र शुक्रवारी महसूल, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या साई रिसॉर्टची पाहणी केली. त्यावेळी रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे पाहणीतून दिसून आहे. यापूर्वी दापोली उपविभागीय अधिकारी यांनीही शासनाला याबाबत एक अहवाल सादर केला आहे.

साई रिसॉर्टपासून काही अंतरावर सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी टाकी आढळून आल आहे. परंतु समुद्रापासून काही अंतरावर बांधण्यात आलेल्या या टाकीला कोणताही पाईप जोडून समुद्रात थेट पाणी सोडण्यात आले नसल्याचे दिसून आल्याने सोमय्यांचा दावा फोल ठरला आहे.

मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या भला मोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन रिसॉर्ट पाडण्यासाठी दापोलीत गेले होते. यावेळी रिसॉर्ट पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु सोमय्यांनी रिसॉर्टबाहेरील काही अंतरावर गाडी पार्किंगच्या ठिकाणच्या टाइल्सवर प्रतिकात्मक हातोडा मारला आणि अवघ्या काही मिनिटात ते निघून गेले.

मागील काही दिवसांपासून सोमय्या म्हणत होते की, मी जाऊन अनिल परब यांच्या मालकीचा साई रिसॉर्ट पाडणार आहे, परंतु अवघ्या काही तासातचं त्यांनी पलटी मारली. आपण हॉटेलवर नाही तर अनिल परब यांनी सरकारी जागेत केलेल्या बेकायदेशीर जागेवरील हातोडा मारल्याचा उल्लेख करत त्यांनी बोलण्याचे टाळले. मात्र सोमय्यांनी या रिसॉर्टप्रकरणी केलेल्या गाजावाजानंतर आता यातून त्यांनी युटर्न घेतल्याची चर्चा रंगतेय.


मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी