घरमहाराष्ट्र३१ डिसेंबरला शिर्डीतील साईबाबा मंदिर रात्रभर खुले

३१ डिसेंबरला शिर्डीतील साईबाबा मंदिर रात्रभर खुले

Subscribe

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी श्री साई मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे ३१ डिसेंबरची शेजारती व १ जानेवारीची पहाटेची काकड आरती होणार नाही.

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या सर्व भाविकांना साईंच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणार्‍या गर्दीचे नियोजन योग्यरितीने व्हावे, या उद्देशाने मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

याशिवाय नाताळ व नववर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे २५ डिसेंबर, ३१ डिसेंबर व १ जानेवारी, असे तीन दिवस श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहणार आहे. तसेच ३१ डिसेंबर व १ जानेवारी असे दोन दिवस वाहन पूजा बंद राहतील, याची साईभक्तांनी नोंद घ्यावी. मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -