मुंबई – अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानच्या घरात घुसून अभिनेत्यावर धारदार चाकूचे सहा वार करण्यात आले. हल्ला ऐवढा गंभीर होता की, चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या शरीरात तुटला होता. गंभीर जखमी अवस्थेत सैफ अली खानसा ऑटो रिक्षामधून लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अभिनेता सैफ अलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा रिक्षाचालक समोर आला आहे. रिक्षाचालकाचे नाव भजनलाल असल्याची माहिती आहे. भजनलाल यांनी गुरुवारी मध्यरात्री नेमकं काय घडलं ते माध्यमांना सांगितलं आहे.
भजनलाल हे नित्यनियमाने रात्री ऑटो रिक्षा घेऊन निघाले होते. मध्यरात्री तीन वाजता दरम्यान एका महिलेने त्यांना आवाज दिला. भजनलाल म्हणाले, एक व्यक्ती लहान मुलासोबत गेटमधून बाहेर आली. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. त्याचा शर्ट रक्ताने माखलेला होता. ती व्यक्ती माझ्या रिक्षात बसली, त्यांच्या बाजूला लहान मुलगा बसलेला होता. महिलेने मला सांगितले की, लिलावती रुग्णालयात घेऊन चला. मी अवघ्या पाच ते सहा मिनिटांत रिक्षा लिलावती रुग्णालयात पोहचवली.
भजनलाल म्हणाले, रिक्षा रुग्णालयाच्या गेटमध्ये पोहोचल्यानंतर ती व्यक्ती रिक्षातून उतरली आणि आवाज दिला, मै सैफ अली खान हूँ… जल्दी स्टेचर लाओ… तोपर्यंत मला माहित नव्हते की माझ्या रिक्षामध्ये सैफ अली खान आहे. त्यांचं शर्ट रक्ताने माखलेलं होत. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. मी त्यांच्याकडून पैसेही घेतले नाही. त्यांचा जीव वाचला याचं मला समाधान आहे.
सैफ अली स्वतः चालत हॉस्पिटलमध्ये…
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून गुरुवारी मध्यरात्री सहा वार करण्यात आले होते. सैफ अली खानचा कार चालक रात्री उपलब्ध नसल्यामुळे त्याला रिक्षातून हॉस्पिटलला नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, आम्हाला कळाले की ते रिक्षातून हॉस्पिटलपर्यंत आले. रिक्षातून उतरल्यानंतर ते स्वतः चालत हॉस्पिटलमध्ये आले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा तैमूर होता. सैफ अली खानच्या शरीरात चाकूचा टोकदार भाग तुटलेला होता. ऑपरेशन करुन तो काढण्यात आला आहे. सैफ अली खानची तब्यत आता बरी आहे. आठ दिवस त्याला आरामाचा सल्ला देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा : Saif Ali Khan Attacked : सैफसाठी जीवघेणा ठरला असता हा चाकूचा तुकडा