Homeताज्या घडामोडीAshish Shelar : आदित्य ठाकरे वांद्र्याला कुठे यायचे त्याच उत्तर आहे; 'सैफ'...

Ashish Shelar : आदित्य ठाकरे वांद्र्याला कुठे यायचे त्याच उत्तर आहे; ‘सैफ’ हल्ल्यावरून शेलारांचं प्रत्युत्तर

Subscribe

Ashish Shelar On Aaditya Thackeray : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एक अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह संपूर्ण वांद्रे परिसर चिंतेत आला आहे. कारण मागील काही दिवसांपासून सातत्याने वांद्र्यातील उच्चभ्रू वस्त्यांसह, कलाकार आणि नेतेमंडळींना हल्लोखोरांनी आपल्या निशाण्यावर ठेवलं आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कायदा व सुव्यस्थेवरून सरकारवर निशाणा साधला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एक अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह संपूर्ण वांद्रे परिसर चिंतेत आला आहे. कारण मागील काही दिवसांपासून सातत्याने वांद्र्यातील उच्चभ्रू वस्त्यांसह, कलाकार आणि नेतेमंडळींना हल्लोखोरांनी आपल्या निशाण्यावर ठेवलं आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कायदा व सुव्यस्थेवरून सरकारवर निशाणा साधला. त्यावर सरकारी मंत्री आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Saif Ali Khan News Ashish Shelar On Aaditya Thackeray Ashish Shelar News In Marathi)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “सैफ अली खानवरील घटनेवर आता राजकारण करण्याची वेळ नाही. मलाही आदित्य ठाकरे यांना राजकीय उत्तर देता येईल. आदित्य ठाकरे वांद्र्याला कुठे यायचे आणि जितेंद्र आव्हाडांकडे काय चालू होतं, याचे उत्तर मला देता येईल, पण आता त्यांना उत्तर देण्याची ही वेळ नाही”, असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

याशिवाय, “सध्या आरोपी पकडणं. सैफ अली खान बरे होणं. त्यांच्या परिवार मानसिक धक्क्यातून बाहेर येणं. या हल्ल्याप्रकरणी ज्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत, त्या पूर्ण करणं. तसेच, या घटना होऊ नये यादिशेने कार्यपद्धती करावी, यावर लक्ष केंद्रीत करावं असे माझे मत आहे”, असेही आशिष शेलार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते आशिष शेलार?

“सैफ अली खानवर झालेला घुसखोरी आणि चाकू हल्ला धक्कादायक आहे. तो स्थिर आहे आणि बरा होत आहे हे ऐकून आम्हांला दिलासा मिळाला आहे आणि आम्ही प्रार्थना करतो की कठीण काळ संपला आहे आणि तो लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत येईल. तथापि, हे घडले हे केवळ महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था किती ढासळली आहे हेच अधोरेखित करते”, असे आदित्य ठाकरे म्हणाला.


हेही वाचा – Saif Ali Khan News : सैफवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलारांचा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोख