Homeक्राइमSaif Ali Khan Update : सैफ अली खानवर चाकू हल्ल्याप्रकरणी एक जण...

Saif Ali Khan Update : सैफ अली खानवर चाकू हल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात; पोलिसांकडून चौकशी सुरू

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरूवारी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि ताब्यात घेतलेला व्यक्ती एकच आहे का, याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरूवारी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि ताब्यात घेतलेला व्यक्ती एकच आहे का, याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जवळपास अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. (Saif Ali Khan Update One accused in custody in Saif Ali Khan stabbing case bandra Police are investigating)

मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती. सैफ अली खान याच्यावरी हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अनेकांची चौकशी केली होती. त्यानंतर आता वांद्रे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशीसाठी बोलावलं आहे. फरार आरोपीसंदर्भात नवे धागेदोरे मुंबई पोलिसांना मिळतात का हे स्पष्ट होईल.

अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे 2:30 वाजताच्या समुरास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले आहेत. हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचं प्राथमिक तपासाअंती सांगण्यात आलं आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर जबरदस्तीने किंवा कुठलीही मोडतोड न करताना घरात घुसल्याचं दिसून आलं आहे.

सैफच्या घरात किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हल्लेखोराचा घरात जाताना किंवा तिथून पळून जातानाचा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही. मात्र इमारतीच्या पायऱ्यांजवळील एका कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाला आहे. या व्हिडीओच्या मदतीने पोलीस आता हल्लेखोराचा तपास करत आहेत.


हेही वाचा – Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, गुन्हा दाखल