मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर तो पुन्हा एकदा घरी परतला. पण या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. 15 जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर मंगळवारी (22 जानेवारी) तो लीलावती रुग्णालयातून पुन्हा घरी परतला. त्याच्या घरात घुसलेल्या एका घुसखोराने भांडणात खानवर सहा वेळा चाकूने वार केल्याची घटना घडली. यावेळी इमारतीच्या सुरक्षेवर आणि त्याच्या वैयक्तिक टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण यानंतर आता त्याच्या सुरक्षेची जबाबदारी बॉलीवूडमधीलच एका बड्या अभिनेत्याने घेतली आहे. (Saif Ali Khan’s security cover to be provided by this actor)
हेही वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभात 100 हून अधिक भाविकांना लाभले जीवनदान, सुधा मूर्ती यांनीही केले कौतुक
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या सुरक्षेची जबाबदारी अभिनेता रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीने उचलली आहे. सध्या सैफ अली खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अभिनेता आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी नवीन उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. रोनित रॉयच्या ‘ऐस सिक्युरिटी ऍंड प्रोटेक्शन’ म्हणजेच ‘एसस्केड सिक्युरिटी एलएलपी’ या एजन्सीकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. 15 जानेवारीच्या हल्ल्यानंतर सैफ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रण अधिक अलर्ट झाली असून सैफच्या घराबाहेरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. त्याच्या घरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. घराच्या बाल्कनीमध्ये स्टिल ग्रीलची जाळी बसवण्यात आली. खासकरून रात्रीच्या वेळी सोसायटीची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. आता सैफ अली खानच्या इमारतीमध्ये ये जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जाणार आहे.
कोण आहे रोनित रॉय?
गेली कित्येक दशके अभिनेता म्हणून काम करणाऱ्या रोनित रॉयने सैफ अली खानला सुरक्षा पुरवल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कंपनीने दिग्गज अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानलादेखील सुरक्षा पुरवली आहे. त्याने छोट्या तसेच मोठ्या पडद्यावरही अभिनेता म्हणून आपली एक वेगळी छाप सोडली आहे. छोट्या पडद्यावर त्याने क्योकी सास भी कभी बहु थी मालिकेत मिहीरची भूमिका साकारली होती. तसेच, रोनित रॉय सुरुवातीला 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जान तेरे नाम’ या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली होती. पण त्यानंतर त्याला छाप पडता आली नाही. पण 2010 मध्ये आलेल्या उडान या सिनेमातून त्याने मोठ्या पडद्यावर कमबॅक केला. असे असतानाही त्याने सुरक्षा एजन्सी काढून अनेक दिग्गज कलाकारांना सुरक्षा पुरविली आहे.