घरमहाराष्ट्रनाशिकमहाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सायली वाणीला सुवर्ण

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सायली वाणीला सुवर्ण

Subscribe

तनिशा कोटेचा, कुशल चोपडाला रजत पदक

नाशिक : धुळे येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या सायली वाणीने अत्यंत अटी-तटीच्या लढतीत ४-३ असा पराभव करून राज्य अजिंक्यपद मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर तनिशाला रजत पदक मिळाले. सायली ही नाशिकची पहिली राज्य विजेती खेळाडू आहे. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अटी-तटीच्या लढतीत मुंबईच्या जश मोदीकडून ३-४ असे पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्याला रजत पदक मिळाले.

१३ वर्षाखाली मुलींच्या गटात मिताली पुरकर हीने कांस्य पदक पटकावले. जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू सराव करतात. त्यांच्या या विजयाबद्दल नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, संजय वसंत, सतीश पटेल, सुहास आगरकर, राकेश पाटील, राज्य संघटनेचे पदाधिकारी यतीन टिपणीस, संजय कडू, योगेश देसाई, समीर भाटे, भैय्या गरुड, श्रीकांत अंतूरकर, प्रकाश जसानी आदींनी अभिनंदन केले.

- Advertisement -

अंतिम फेरीचा निकाल असा…

  • १७ वर्षाखालील मुली : सायली वाणी वि. तनिशा कोटेचा
    ८-११, ११-७, १०-१२, ११-६, ११-९, १०-१२ व ११-९
  • १७ वर्षाखालील मुले : जश मोदी वि. कुशल चोपडा
    ९-११, ११-४, ११-५, ११-९, ८-११, ६-११ व ११-८
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -