घरताज्या घडामोडीक्या बात है! महाराष्ट्रातील 'हे' गाव कोरोनामुक्त, एक महिन्यापर्यंत एकही रुग्ण नाही

क्या बात है! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव कोरोनामुक्त, एक महिन्यापर्यंत एकही रुग्ण नाही

Subscribe

८ हजार लोकसंख्या असलेल्या गावाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली

संपूर्ण राज्यात कोरोनाचा हाहा:कार सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनामुळे हादरुन गेले आहे. मराठवाडा ,विदर्भ,खान्देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरु आहे. मात्र यात सकारात्मक बाजू समोर आली आहे ती म्हणजे खान्देशातील एक गाव संपूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या एक महिन्यापासून त्या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. या गावाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हे गाव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव खान्देशातील हॉट्स पॉट गाव होते. मात्र आता या गावाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

जळगावातील भुसावळ येथील साकेगाव असे कोरोनामुक्त होणाऱ्या या गावाचे नाव आहे. या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला होता. मार्च महिन्यात शंभरहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे हे गाव भुसावळमधील हॉट्स पॉट गाव ठरले होते. सुरुवातील गावातील लोक भितीमुळे कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत नव्हते मात्र ग्रामपंचायत कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्याचप्रमाणे साकेगावात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले. वेळोवेळी गावात औषध व सॅनिटायझर फवारणी करण्यात येत होती. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच स्पीकरवरुन मार्गदर्शन करत होते. साकेगावात ठिकठिकाणी हात धुण्याची,सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

गावकरी आणि ग्रामपंचायत कर्मचारी व वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या वेळीच मदतीने आणि उपचारांमुळे साकेगाव आज कोरोनामुक्त झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, साकेगावात गेल्या एक महिन्यापासून एकही रुग्ण सापडलेला नाही. साकेगाव ८ हजार लोकांचे स्मार्ट साकेगाव आज कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनावर मात करण्याच्या उत्तम कामगिरीसाठी साकेगाव ग्रामपंचायतीला २४ हजारांचे बक्षीसही देण्यात आले.


हेही वाचा – धक्कादायक! शेजाऱ्यांसोबतच्या भांडणापायी महिलेने १४ महिन्यांच्या मुलाला आणि ३ वर्षांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -