Sakinaka Rape Murder Case : साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण; आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा

साकिनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आली आहे.

Sakinaka Rape Murder Case Dindoshi Sessions Court decision Accused Mohan Chauhan sentenced to death
Sakinaka Rape Murder Case : साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण; आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा

साकिनाका बलात्कार प्रकरणातील (Sakinaka Rape Murder Case) आरोपी मोहन चौहानला (Mohan Chauhan) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आली आहे. मुंबईत गेल्या वर्षी एका महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. बलात्काराची घटना अमानवीय होती. आरोपीने बलात्कारानंतर तरुणीची हत्या केली आणि तिच्या गुप्त भागावर रॉड घुसवला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्या तरुणीचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी मोहन चौहान दोषी आढळला असून दिंडोशी सत्र न्यायालयाने सुनावणीदरम्यान फाशीची शिक्षा सुनावली आहे.

साकिनाका बलात्कार प्रकरणातील (Sakinaka Rape Case) आरोपीला दिंडोशी कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. कोर्टात दोन्ही बाजूनं युक्तिवाद झाला. कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं असून आपला निर्णय राखून ठेवला आहे. कोर्टाकडून आज निर्णय देण्यात येणार आहे.

मुंबईत २०२१ मध्ये साकिानाका परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली. ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तीची हत्या करण्यात आली. बलात्कार करणारा आरोपी आणि पीडित महिला एकमेकांच्या परिचयाचे होते. आरोपीने महिलेला एका टेम्पोमध्ये मारहाण केली. एका सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहून पोलिसांना माहिती दिली होती. पोलीस अवघ्या १० मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी टेम्पोत पाहिले असता महिला जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. क्षणाचाही विलंब न करता महिला पोलिसांनी त्याच टेम्पोतून महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. पीडित महिलेच्या गुप्त भागातून रक्तस्त्राव होत होता. राजावाडी रुग्णालयात महिलेवर उपचार कऱण्यात येत होते. तिच्या गुप्त भागावर रक्तस्त्राव होत असल्याने रात्री उशिरा तिच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र ती महिला बेशुद्धावस्थेत होती. प्रकृती गंभीर असल्याने तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनेच्या १८ दिवसांत तपास पूर्ण करुन आपला अहवाल तयार केला होता. या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला आता कोर्टाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा : साकीनाका बलात्काराचा तपास करणाऱ्या डॅशिंग एसीपी जोत्स्ना रासम आहेत तरी कोण?